Take a fresh look at your lifestyle.

झोमॅटो बंद करणार ही घरपोच सेवा, ग्राहकांवर काय परिणाम होणार वाचा..?

मुंबई : कोरोनामुळे भारतात ऑनलाइन उद्योग-व्यवसायात मोठी वाढ झाली. त्यात किराणा वितरण व्यवसायाचीही मोठी भरभराट झाली. ग्राहक आता सुपरफास्ट वितरण सेवा स्वीकारत असून, अनेक कंपन्या अवघ्या 15-30 मिनिटांत घरपोच डिलिव्हरी करीत आहेत. त्यात स्विगी (Swiggy), डुन्जो (Dunzo), ग्रोफर्स (Grofers) सारख्या कंपन्या तर आघाडीवर आहेत. एका अहवालानुसार, पुढील 5 वर्षांत जलद वितरणाचा हा व्यवसाय 10-15 पटीने वाढेल नि ही बाजारपेठ सुमारे 5 अब्ज डॉलर्सची असेल, असे सांगण्यात येते.

Advertisement

ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या झोमॅटोही या व्यवसायात उतरली होती. झोमॅटोने जुलैमध्ये प्रायोगिक तत्वावर काही शहरांमध्ये किराणा वितरण सुरू केले होते. कंपनी 45 मिनिटांत ग्राहकांना किराणा घरपोच करीत होती, पण स्पर्धक कंपन्यांचा विचार केल्यास हा कालावधी खूपच जास्त आहे.

Advertisement

ऑर्डर पूर्ण करण्यात होणारा विलंब, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद नि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन झोमॅटो कंपनीने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर स्पर्धक कंपन्या मालाच्या घरपोच डिलिव्हरीसाठी 15 मिनिटं घेत असताना झोमॅटो त्यात मागे पडत होती.

Advertisement

झोमॅटोने आता ग्रॉफरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने ग्रॉफर्समध्येही 10 टक्के हिस्सेदारी आहे. झोमॅटो ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरविण्यावर, व्यावसायिक भागीदारांना वाढीच्या सर्वात मोठ्या संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमच्या ग्राहकांना, व्यावसायिक भागीदारांना फायदा देण्याचे सध्याचे मॉडेल हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे आम्हाला वाटत नाही. म्हणून, आम्ही 17 सप्टेंबर 2021 पासून किराणा मालाची प्रायोगिक वितरण सेवा बंद करीत असल्याचे झोमॅटोने पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

आम्ही किराणा वितरण पथदर्शी प्रकल्प बंद करीत आहोत. या मार्केटमध्ये ग्रॉफर्स खूप चांगली कामगिरी करीत आहे, जे 10 मिनिटांत डिलिव्हरी देत आहेत. अशा परिस्थितीत या कंपनीतील आमची गुंतवणूक कंपनीच्या भागधारकांसाठी एक चांगला पर्याय असेल, असे झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले.

Advertisement

खाद्यतेल स्वस्त होणार; मोदी सरकारने पुन्हा घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा, कसा होईल फायदा
मोदी सरकार लाॅंच करणार नवीन चॅनेल, संसदेचे कामकाज, माहितीपूर्ण कार्यक्रम त्यावर प्रसारित होणार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply