Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ओबीसी आरक्षणाचा ‘तो’ मुद्दाच निकाली; पहा नेमके काय म्हटलेय निवडणूक आयोगाने

मुंबई : इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीयदृष्ट्या आरक्षण कमी करण्याच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे करोनाच्या संकटाला पुढे करून राज्य सरकारने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकला. मात्र, अखेरीस आता या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यानुसार आता या निवडणुकीत कोणता पक्ष कोणत्या मुद्द्यावर इतर पक्षांना घेरणार हेही लवकरच समोर येईल. मात्र, करोना कालावधी असूनही हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात अपयश आल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून यावर रान उठवले जाण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-१९ मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन निर्णय झाला होता. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. ९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे ११ ऑगस्ट २०२१ रोजीचे कोविड-१९ संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय देताना पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिल्याने तडकाफडकी तारखा जाहीर झालेल्या आहेत.

Advertisement

त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी ही मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर यादरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement
निवडणूक प्रक्रियेमधील महत्वाच्या तारखा :
वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे :  २१ सप्टेंबर २०२१
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे : २७ सप्टेंबर २०२१ (निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी)
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे : २९ सप्टेंबर २०२१ (निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील असलेल्या ठिकाणी)
मतदान : ५ ऑक्टोबर २०२१
मतमोजणी : ६ ऑक्टोबर २०२१

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply