Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 5 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; पहा, कधी होणार मतदान

मुंबई : राज्यातील अकोला, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आता मात्र निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

याआधी धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषदांसाठी 19 जुलै रोजी मतदान होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य सरकारने कोविड 19 चे कारण देत पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत विनंती केली होती. या गोष्टींचा विचार करुन निवडणूक आयोगाने या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.

Advertisement

या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड 19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे. तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आयोगाने पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Advertisement

5 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समिती पोटनिवडणुकांचा समावेश केलेला नव्हता. आता मात्र येथील निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply