Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. अखेर पाकिस्तानचा ‘तो’ डाव फसलाच; पहा, तालिबानने ‘त्या’ निर्णयाबाबत नेमके काय म्हटलेय

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबान चीन आणि पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकत चालला आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. तालिबानकडे पैसे नाहीत हे ओळखून चीन आणि पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. चीनने आधीच तालिबानला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पाकिस्तानने तसाच डाव टाकला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तान बरोबर आपल्या चलनातच व्यापार करणार असल्याचे म्हटले होते. या निर्णयाच्या माध्यमातून पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये आधिक हस्तक्षेप करत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता मिळत असलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानला धक्का देणारा निर्णय घेतला आहे.

Advertisement

पाकिस्तानी रुपयामध्ये व्यापार करण्यास तालिबानने नकार दिला आहे. समा टीव्हीने अफगाणिस्तान मधील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, शेजारील देशांबरोबर होणारे व्यवहार अफगाणी चलनातच केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान लवकरच अफगाणिस्तान बरोबर पाकिस्तानी रुपयांमध्ये व्यापार सुरू करेल असे सांगण्यात आले होते. मात्र, या घोषणेस एक दिवस उलटत नाही तोच तालिबानने असे दावे फेटाळून लावले आहेत. कोणताही मोठा व्यवसाय पाकिस्तानी चलनात केला जाईल या बातमीत तथ्य नाही, असे तालिबानने स्पष्ट केले आहे.

Advertisement

तालिबानने अफगाणिस्तान मध्ये सरकार गठीत केले आहे. आता देश चालवायचा कसा असा मोठा प्रश्न तालिबान्यांसमोर आहे. कारण, अमेरिका आणि अन्य जागतिक वित्तीय संस्थांनी अफगाणिस्तानच्या राखीव निधीवर निर्बंध आणले आहेत. तसेच तालिबानला कोणतीही आर्थिक मदत करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालिबानच्या अडचणी वाढणार आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत चीनने संधी साधत तालिबानला मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे तालिबानला अन्य देशांच्या मदतीची सध्या गरज राहणार नाही, असे सांगण्यात येत आहे. या मदतीच्या मोबदल्यात चीन काय घेणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, आता जगाची पर्वा न करता चीनने या देशात सरळसरळ हस्तक्षेप सुरू केल्याचे याद्वारे स्पष्ट होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply