Take a fresh look at your lifestyle.

राज्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम; पहा, आज कोणत्या जिल्ह्यांत बरसणार

मुंबई : देशात सध्या अनेक राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत आहे. राज्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार असून आज हवामान विभागाने आणखी काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे येत्या 24 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांत सुद्धा अतिवृष्टीचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांतील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मराठवाडा परिसरातही तुरळक पाऊस होण्याचा अंदाज आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होईल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात मंगळवारी पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यातील घाट परिसरासाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. या काळात विदर्भातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.

Advertisement

दरम्यान, काल रविवारी राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सोमवारी मात्र हवामानात बदल झाला आहे. सकाळपासून ऊन पडले आहे. सध्या पावसाची परिस्थिती दिसत नसली तरी हवामानात बदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण, आज हवामान विभागाने अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आणखी तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply