Take a fresh look at your lifestyle.

भाजपाने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसने घेतलीय फिरकी; विचारलाय ‘हा’ महत्वाचा प्रश्न

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज भाजपने भुपेंद्र पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. आज भुपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गुजरात मधील या राजकीय घडामोडींची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने या घडामोडींवर भाष्य केले आहे.

Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की ‘भाजप सध्या आपल्या अपयशी मुख्यमंत्र्यांना हटवण्यात व्यस्त आहे. अखेर भाजपाला याची जाणीव केव्हा झाली, की आपले मुख्यमंत्री नीट काम करत नाहीत. चांगले काम न केल्यामुळे भाजपने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. आणि इतर अनेक राज्ये आहेत जिथे अपयशी मुख्यमंत्री असून त्यांना बदलण्याची गरज आहे. संबंधित राज्यातील लोकांना माहीत होते की बी. एस. येडियुरप्पा, दोन रावत आणि विजय रूपाणी कित्येक महिने खराब कामगिरी करत होते. आणखी बरेच आहेत जे बदलले पाहिजेत. यादी फार मोठी आहे, ज्यामध्ये गोवा, हरियाणा, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.’

Advertisement

रविवारी, विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मार्चमध्ये उत्तराखंडचे चार वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तिरथ रावत यांना मुख्यमंत्री केले. पण, अवघ्या तीन महिन्यांतच त्यांचा राजीनामा घेतला, आणि आता पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री बदलाबाबत काँग्रेसनेही टीक केली आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे, की मुख्यमंत्र्यांचे चेहरे बदलून पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधातील व्यापक जनतेचा रोष शांत होऊ शकत नाही. घसरलेला जीडीपी, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, पायाभूत सुविधांची वाईट स्थिती याबद्दल सर्वांना माहिती आहे. अपयश लपवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची ही युक्ती यशस्वी होणार नाही.

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply