Take a fresh look at your lifestyle.

म्हणून यावर्षी जगभरातील मोबाइल इंडस्ट्रीला बसणार झटका; पहा, कशामुळे आलीय ‘ही’ वेळ

नवी दिल्ली : सिलीकॉन सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे आजमितीस जगभरातील मोबाइल उद्योगच संकटात सापडला आहे. सेमी कंडक्टर लवकर मिळत नसल्याने मोबाइल कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम नव्याने सुरू झालेल्या मोबाईल फोनवर दिसून येत आहे. असा अंदाज आहे, की या वर्षी नवीन फोन मागील वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात लाँच होतील. यामध्ये लहान ते मोठ्या सर्व ब्रँडचा समावेश आहे.

Advertisement

गेल्या वर्षी एकूण 207 फोन लाँच झाले होते. यावर्षी आतापर्यंत फक्त 103 फोन लाँच झाले आहेत. या वर्षी 190 फोन लाँच केल्याचा अंदाज आहे. म्हणजेच, नवीन मोबाइलमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने आपला नेक्स्ट फोन लॉन्च पुढे ढकलला आहे. कंपनीने सांगितले की, सेमी कंडक्टरचा अभाव आणि अन्य कारणांमुळे जियो फोन नेक्स्ट आता दिवाळीत येणार आहे. जियो प्रमाणेच यापूर्वीही अनेक कंपन्यांचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

Advertisement

काउंटरपॉईंटच्या मते, जगभरातील टॉप फोन ब्रँडचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले आहे. फोन लॉंच करणाऱ्या कंपन्यांसमोर उत्पादन समस्या, वाढत्या किंमती आणि अन्य काही समस्या आहेत. चिप्सच्या अभावामुळे कंपन्यांना फोनच्या किंमतीही वाढ करावी लागत आहे.

Advertisement

पॉवर मॅनेजमेंट सर्किट हे मोबाईल फोनच्या कमतरतेच्या प्रमुख घटकांपैकी एक आहेत. यासह, मेमरी, प्रोसेसर आणि लॉजिस्टिक्सची वाढती किंमत देखील कंपन्यांसाठी समस्या निर्माण करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे डिजिटल प्लॅटफॉर्म जियो प्लॅटफॉर्म दिवाळीपासून जिओ नेक्स्ट फोन उपलब्ध करेल. म्हणजेच, अजून सुमारे 50 दिवस बाकी आहेत. हा फोन गुगलच्या मदतीने विकसित केला जात आहे. संगणक, सेल फोन, गॅझेट, वाहने आणि अगदी मायक्रोवेव्ह ओव्हन सारख्या अनेक वस्तूंमध्ये सिलीकॉन सेमी कंडक्टर वापरले जातात. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन अभ्यासामुळे डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅब्लेटची मागणी वाढली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply