Take a fresh look at your lifestyle.

चीन-पाकिस्तान अडकलेत ‘या’ भीषण संकटात; पहा कशामुळे ओढवलेय ‘हे’ संकट

नवी दिल्ली : भारताचे दोन्हीही कुरापतखोर शेजारी देश सध्या कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. पाकिस्तानमध्ये तर परिस्थिती दिवसेंदिवस जास्त खराब होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तशाच संकटाचा आज पाकिस्तान सामना करत आहे. पाकिस्तानात सध्या कोरोनाची चौथी लाट आली असून येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पाकिस्तान मधील अनेक दवाखान्यात ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

Advertisement

पाकिस्तान मधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी देशातील रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गरज भासत असल्याचे म्हटले आहे. तसेही पाकिस्तान सध्या अनेक संकटांनी घेरला गेला आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कोरोनामुळे बेरोजगारी आणि गरीबीत मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. या संकटातच आता कोरोनाच्या चौथ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. ऑक्सिजन तयार करणारी कंपनी पाकिस्तान ऑक्सिजन लिमिटेडने रुग्णालयांना एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

Advertisement

चीनमध्येही पुन्हा कोरोना वेगाने फैलावत आहे. आता चीनमधील पुतियान शहरात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या शहरात कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या शहरातील नागरिकांना अन्य शहरात जाण्यास निर्बंध आहेत. शहर पूर्णपणे लॉक केले आहे. अन्य शहरात कोरोना पसरणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. याआधी चीनच्या अन्य काही प्रांतात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते. त्यावेळीही प्रशासनाने अशाच कडक उपाययोजना केल्या होत्या. आता पुन्हा कोरोनाने चीनला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या शहरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यात सिंगापूर येथून चीनमध्ये परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply