Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव : महिनाभरात सोन्याचे दराने केलेय ‘हे’ रेकॉर्ड; पहा, आज काय आहेत सोने-चांदीचे दर

मुंबई : देशात सोने आणि चांदीचे दर मागील काही दिवसांपासून कमी जास्त होत आहेत. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मात्र थोडीशी वाढ नोंदवण्यात आली. तरीसुद्धा सध्या सोन्याचे दर मागील एक महिन्याच्या निचांकी पातळीवर आले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या दरात 0.14 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे दर 46 हजार 872 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. तर, दुसरीकडे आज चांदीचे दर मात्र कमी झाले आहेत. आज चांदीच्या दरात 0.4 टक्के घसरण झाली असून सध्या एक किलो चांदी 63 हजार 345 रुपये असे दर आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

देशात सर्व शहरात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. चेन्नई शहरात 48 हजार 390 रुपये, मुंबई शहरात 47 हजार 070 रुपये तर कोलकाता शहरात 49 हजार 140 रुपये असे सध्या दर आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply