Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन व्यवहारासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, रस्त्यावरील विक्रेत्यांना होणार मोठा लाभ..

नवी दिल्ली : मोदी सरकार डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारतातील डिजिटल व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिक, व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, असे असले, तरी अजूनही देशात ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण तितके वाढलेले नाही. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकच सध्या तरी डिजिटल पेमेंट करताना दिसतात. छोटे-मोठे व्यापारी, खासगी वर्गात या डिजिटल पेमेंटबाबत मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचा अभाव असल्याचे दिसते.

Advertisement

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारने आता ‘मैं भी डिजिटल 3.0’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार रस्त्यावर विविध वस्तूंची करणाऱ्या विक्रेत्यांना डिजिटल पेमेंटद्वारे पेमेंट करणे, तसेच ते प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.

Advertisement

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 223 शहरांतील पथ विक्रेत्यांना त्यासाठी प्रशिक्षण देणार येणार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी यांनी संयुक्तपणे एका आभासी कार्यक्रमात या योजनेची घोषणा केली.

Advertisement

फोन-पे (PhonePe), पेटीएम (PayTM), भारत-पे (BharatPe) यांसह देशातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट कंपन्याही सरकारच्या या मोहिमेला पुढे नेण्यासाठी सरसावल्या आहेत. या कंपन्या डिजिटल पेमेंट, यूपीआय आयडी (UPI ID) आणि क्यूआर कोड (QR Code) बद्दल देशभरातील पथविक्रेत्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

Advertisement

डिजिटल पेमेंटबाबत सर्व आवश्यक ती माहिती या विक्रेत्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर दुकाने चालवणारे लहान आणि कमी शिक्षित व्यापारीही डिजिटल पेमेंट करण्यास आणि स्वीकारण्यास सक्षम होतील. त्यातून डिजिटल इंडिया मोहिमेला मोठ्या प्रमाणाच चालना मिळणा आहे.

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारच्या सूचनेनुसार, पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी कमी व्याजदराने, नाममात्र अटींवर कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत सुमारे 45.5 लाख पथ विक्रेत्यांनी कर्जासाठी अर्ज केले असून, पैकी 27.2 लाख अर्जदारांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 24.6 लाख अर्जदारांना आतापर्यंत 2444 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. माहितीनुसार, 70,448 कर्जदारांनी पहिला हप्ताही भरला आहे.

Advertisement

झोमॅटो बंद करणार ही घरपोच सेवा, ग्राहकांवर काय परिणाम होणार वाचा..?
खाद्यतेल स्वस्त होणार; मोदी सरकारने पुन्हा घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा, कसा होईल फायदा

Advertisement
Advertisement

Leave a Reply