Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तालिबानने ‘तो’ निर्णय घेणे टाळले; रशियाने आधीच दिला होता नकार

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली तालिबानने सुरू केल्या होत्या. सरकारच्या शपथग्रहण समारोहाची तयारी सुद्धा केली होती. मात्र, आता याबाबत तालिबानने मोठा यु टर्न घेतला आहे. तालिबानने हा शपथग्रहण समारोहच रद्द केला असल्याची माहिती आहे. तालिबान सरकार आता शपथग्रहण समारोह आयोजित करणार नाही.

Advertisement

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबान सरकारने पैशांचा अपव्ययाचे कारण देत शपथविधी सोहळा रद्द केला आहे. यापूर्वी अशी अपेक्षित मानले जात होते, की तालिबान सरकार शपथविधी समारंभ आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी आयोजित करेल.

Advertisement

याआधी, रशियाच्या एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते, की तालिबानने मित्रपक्षांच्या दबावानंतर अफगाणिस्तानात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा रद्द केला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या सांस्कृतिक आयोगाच्या सदस्यांनी सांगितले की, नवीन अफगाणिस्तान सरकारचा शपथविधी सोहळा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला होता. लोकांना आणखी गोंधळात टाकू नये म्हणून मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.

Advertisement

सरकार स्थापनेपूर्वी तालिबानने शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी चीन, तुर्की, पाकिस्तान, इराण, कतर आणि अन्य काही शेजारी देशांना आमंत्रित केले होते. तालिबानने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा बहुतेक देशांनी तालिबानला ओळखण्याची घाई करणार नसल्याचे म्हटले आहे. दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर तालिबानने मंगळवारी अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली.

Advertisement

रशियाने मात्र तालिबानचे आमंत्रण नाकारले आहे आणि शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर तालिबानने तर हा समारोहच रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला आहे. तालिबानने हा निर्णय का घेतला याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply