Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..! चोराच्या उलट्या बोंबा; पाकिस्तान म्हणतोय तालीबानी शांतता….

अफगाणिसस्तानमधील बदलत्या परिस्थितीवर पाकिस्तान बारकाईने नजर ठेऊन आहे. ज्यात अफगाणिस्तानच्या तातडीच्या गरजा आणि प्रशासकीय संरचनेची गरज पुर्ण करण्यासाठी नवीन राजकीय व्यवस्था तयार करण्याची गोष्ट सहभागी आहे. 

लाहोर : सध्या जगभर तालीबान्यांचे क्रुर कृत्यांची चर्चा सुरू आहे. अफगाणीस्तानमध्ये काबुल विमानतळ असो वा अफगाणीस्तानवर कब्जा करतानाचे कृत्य मानवतेला काळीमा फासणारेच. परंतू आता भारताचा कट्टर शत्रू असलेल्या तालीबान्यांविषयी पाकिस्तानने एक मोठे विधान केले आहे.

Advertisement

पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार अहमद पत्रकार परिषदेत म्हणाले की, अफगाणिसस्तानमधील बदलत्या परिस्थितीवर पाकिस्तान बारकाईने नजर ठेऊन आहे. ज्यात अफगाणिस्तानच्या तातडीच्या गरजा आणि प्रशासकीय संरचनेची गरज पुर्ण करण्यासाठी नवीन राजकीय व्यवस्था तयार करण्याची गोष्ट सहभागी आहे.

Advertisement

असीम म्हणाले की, अफगाणीस्तानच्या शांततेत पाकिस्तानची महत्वाची भुमिका आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, अशा प्रकारच्या मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाण लोकांच्या बाजुने उभा राहत महत्वपुर्ण भुमिका बजावेल.

Advertisement

अफगाणीस्तानमध्ये सुरू असलेला तालिबान्यांचा नंगानाच संपुर्ण जगाने पाहिला. मात्र आता 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने अफगाणीस्तानच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले की,  तालीबानी नेतृत्वातील अफगाणीस्तानमधील नवे अंतरीम सरकार युध्दग्रस्त अफगाणीस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता आणू शकेल. तसेच अफगान नागरीकांच्या मानवीय आणि विकासासंबंधी गरजा पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम करेल.

Advertisement

पाकिस्तानने शांततेच्या गोष्टी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे चित्र आहे. एकीकडे दहशतवादाला खतपाणी घालणे, अफगाणीस्तानमधील परिस्थिती निर्माण करण्यासाठी जबाबदार असणे त्याच वेळी तालिबान्यांकडून शांततेची अपेक्षा ठेवणे मोठे आश्चर्य आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply