Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार लाॅंच करणार नवीन चॅनेल, संसदेचे कामकाज, माहितीपूर्ण कार्यक्रम त्यावर प्रसारित होणार..

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजासह माहितीपूर्ण कार्यक्रमही पाहण्यासाठी मोदी सरकार नवी वाहिनी सुरु करणार आहे. या चॅनेलचे नाव आहे, संसद टीव्ही.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १५ सप्टेंबरला या नवीन वाहिनीची लाँचिंग करण्यात येणार आहे.

Advertisement

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळून संसद टीव्ही वाहिनी बनविण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्ण सिंह, अर्थतज्ज्ञ बिबेक देब्रोय, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा हे या नवीन वाहिनीवर स्वतंत्र कार्यक्रमांचे संचालन करतील, असं सूत्रांनी सांगितले.

Advertisement

संसद टीव्ही ही एक माहितीपूर्ण वाहिनी असेल. या वाहिनीद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी लोकशाही मूल्ये आणि देशातील संस्थांशी संबंधित विषयांवर उच्च दर्जाची माहिती सादर करेल, असे सूत्रांनी सांगितले.

Advertisement

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर संसद टीव्हीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. संसद टीव्ही ही वाहिनी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत औपरिकरित्या लाँच केली जाईल.

Advertisement

अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सान्याल अर्थव्यवस्थेवर आणि शल्य चिकीत्सक अंबरीश मिथायी हे आरोग्यसंबंधीच्या विषयांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. काँग्रेस नेते कर्ण सिंह हे विविध धर्मांबाबत, तर बिबेक देब्रोय हे इतिहास आणि अमिताभ कांत हे भारतातील सुधारणांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. हेमंत बत्रा कायद्यांशी संबंधित विषयांवर कार्यक्रमाचे संचालन करतील.

Advertisement

भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे माजी सचिव रवी कपूर हे संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर लोकसभा सचिवालयातील संयुक्त सचिव मनोज अरोरा हे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) आहेत.

Advertisement

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बेराेजगार भत्ता, श्रम मंत्रालयाकडून योजनेला मुदतवाढ..!
करदात्यांना दिलासा.. आयटीआर भरण्यासाठी मोदी सरकारकडून मुदतवाढ, कसा होणार फायदा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply