Take a fresh look at your lifestyle.

सावधान..! गणपतीच्या आरतीच्या आधी ती गोष्ट केली तर गंभीर परीणाम…

सध्या कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, हात सॅनिटायजरने स्वच्छ ठेवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला आहे. तर याविषयी सरकारने गणेशोत्सवासाठी काही नियम आणि निर्बंध घालून दिले आहेत. त्यामुळे त्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक गणेशभक्ताचे पहिले काम आहे. 

पुणे : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि हा सण महाराष्ट्रात महत्वाचा सण म्हणून ओळखला जाऊ लागला. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापणेपासून गणेशविसर्जनापर्यंत सगळेच जण उत्साहात असतात. त्यात श्री गणेशाची विधीवत पुजा, आरतीच्या वेळी तर उत्साहाला पारावार उरत नाही. मात्र उत्साहाच्या भरात गणपतीची आरती करण्यापुर्वी केलेली चूक तुमच्या आयुष्यावर गंभीर परीणाम घडवू शकते.

Advertisement

सध्या कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. त्यामुळे मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, हात सॅनिटायजरने स्वच्छ ठेवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला आहे. तर याविषयी सरकारने गणेशोत्सवासाठी काही नियम आणि निर्बंध घालून दिले आहेत. त्यामुळे त्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक गणेशभक्ताचे पहिले काम आहे.

Advertisement

या गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गणपती बाप्पाची विधीवत पुजा करणे, दुर्वा, मोदक, अगरबत्ती लावणे आणि गणपती बाप्पाची आरती पाठ असणे. मात्र सध्या कोरोनामुळे आपण बहुतेकवेळा हात सॅनिटायजरने स्वच्छ करतो. परंतू गणपतीच्या आरतीच्या वेळी सॅनिटायजरचा वापर करून आरती घेतांना सॅनिटायजर लावले तर हात भाजण्याची शक्यता असते. कारण सॅनिटायजर हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे निरंजनावरून हात फिरवण्याआधी सॅनिटायजर हाताला लावले असल्यास हात भाजू शकतो.

Advertisement

त्यामुळे गणपतीची आरती घेण्याआधी हाताला सॅनिटायजर लावू नये. तसेच हाताला सॅनिटायजर लावले असल्यास आधी पाण्याने हात स्वच्छ धुवा आणि मगच आरती घ्या. गणेशोत्सव काळात काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply