Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. राजधानी दिल्ली शहरात पहिल्यांदाच घडलेय ‘असे’ काही; पहा, कुणी केलाय ‘हा’ दावा

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली शहरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस रविवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे. या जोरदार पावसाने शहराची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सगळीकडे पाणी दिसत आहे. विमानतळाच्या परिसरातही पाणी जमा झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहे. विशेष म्हणजे, शहरात याआधी इतका पाऊस कधीच पडला नव्हता. यावेळी सप्टेंबर महिन्यात सन 1944 नंतर सर्वाधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या मते, या वर्षी दिल्लीत गेल्या काही वर्षांमध्ये मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस पडला आहे.

Advertisement

सप्टेंबरमध्ये 390 मिमी पाऊस पडला आहे. याआधी 77 वर्षांपूर्वी सप्टेंबर 1944 मध्ये सर्वाधिक पाऊस 417 मिमी नोंदवला गेला. दिल्लीत 4 महिन्यांत 1139 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जी 46 वर्षांतील सर्वाधिक आहे. 1975 मध्ये झालेल्या 1155 मिमी पावसापेक्षा हे थोडे कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) वरिष्ठ वैज्ञानिक आर. गेनमनी यांनी सांगितले की, दिल्लीत रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील. यात दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि राजस्थानचा समावेश असेल. पूर्व राजस्थान आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण होणारी यंत्रणा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 17-18 सप्टेंबरपर्यंत दिल्लीत पाऊस सुरू राहील.

Advertisement

नवी दिल्लीतील प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने (आरडब्ल्यूएफसी) शनिवारी पुढील दोन तासात दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर) मध्ये मध्यम ते मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लोन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात अनेक राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश या राज्यात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवसात मुसळार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply