Take a fresh look at your lifestyle.

राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार; पहा, हवामान विभागाचा काय दिलाय इशारा

मुंबई : राज्यात पावसाने काही दिवस उघडीप दिली होती. आता मात्र देशभरात अनेक राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा या भागात पुढील 5 दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात 13 सप्टेंबर आणि कोकण, गोव्यामध्ये 13 ते 14 सप्टेंबर रोजी अति मुसळधार पाऊस होईल, असा इशारा विभागाने दिला आहे.

Advertisement

सध्या बंगालच्या उपसागरात सायक्लोन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकत चालले आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या समुद्र किनारी हे वादळ पुढील 48 तासात धडक देण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातही होणार असून काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. नगर शहरात कालपासून अशीच परिस्थिती आहे. शहरात आजही दुपारच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस पडला. ढगाळ हवामान असल्याने जोरदार पाऊस होईल, अशी परिेस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत तर पावसाने थैमान घातले आहे. मागील दशकभरात कधीही इतका पाऊस पडलेला नाही. यावेळी मात्र दिल्ली शहरात तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दिल्लीत ठिकठिकाणी पाणी जमा झाले आहे. विमानतळ सुद्धा रनवे परिसर जलमय झाला आहे. विमानतळ परिसरात बहुधा पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात दिल्लीत 97 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पुढील काही तासात आणखी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply