Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेल स्वस्त होणार; मोदी सरकारने पुन्हा घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा, कसा होईल फायदा

नवी दिल्ली : देशात खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. किमती कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. कारण, आजही खाद्यतेलांच्या किमती सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्तच आहेत. कोरोना महामारी आणि वाढत जाणारी महागाई यामुळेही तेलांचे भाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत आता देशात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा एकदा पाम तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. यावेळी आयात शुल्क 5.5 टक्क्यांनी कमी केले आहे.

Advertisement

देशभरात खाद्यतेलांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. याआधी खाद्यतेलांचे दर कधीही इतके वाढले नव्हते. आता तर सणासुदीचा काळ आहे. या दिवसात तेलास जास्त मागणी असते. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करुन सरकारने पुन्हा एकदा पामतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. याआधी मागील महिन्यात सुद्धा काही प्रमाणात तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

Advertisement

या निर्णयानुसार येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पाम तेलावरील आयात शुल्क 30 टक्क्यांवरुन 24.7 टक्क्यांवर आणले आहे. रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरुन 35.75 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. रिफाइंड सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 45 टक्क्यांवरुन 37.5 टक्के केले आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी कोरोना महामारी संकट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी घट होऊ शकते, असा अंदाज ‘इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एसईए) चे वरिष्ठ कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांनी व्यक्त केला होता.

Advertisement

भारत जगभरात तेलांचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारताने कमी खरेदी केल्यामुळे मलेशियाचे पाम तेल आणि अमेरिकेचे सोया व सूर्यफूल तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. किमती कमी होऊ शकतात. कोरोना संकटाच्या आधी भारतातील तेलाचा वापर सातत्याने वाढत होता. पण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला संपलेल्या मार्केटिंग वर्षात, तेलांचा वापर 2.1 कोटी टन राहिला. मागील वर्षात हाच आकडा 2.25 कोटी टन इतका होता.

Advertisement

देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 10 टक्के केले होते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीआयसी) म्हटले होते, की इतर पाम तेलावरील आयात शुल्क 37.5 टक्के असेल. आयात शुल्काचे नवीन दर 30 जून ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू आहेत. यापूर्वी कच्च्या पाम तेलावर 15 टक्के आणि आरबीडी पाम तेल, आरबीडी पामोलिन, आरबीडी पाम स्ट्रेन आणि इतर पाम तेलावर 45 टक्के मूलभूत सीमाशुल्क होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply