Take a fresh look at your lifestyle.

अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर बनविणारी कंपनी विक्रीला..! शापूरजी पालोनजी समूहावर कर्जाचा बोजा..!

नवी दिल्ली : घरोघरी नागरिकांना शुद्ध पाणी पाजणारी युरेका फोर्ब्स (Eureka Forbes) ही कंपनी अडचणीत आली आहे. त्यामुळे कंपनीची विक्री करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. शापूरजी पालोनजी ग्रुप ((SP Group)च्या 17 कंपन्यांपैकी युरेका फोर्ब्स ही एक कंपनी आहे. शापूरजी पालोनजी समूहावरच सध्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, या समूहावर सुमारे 20 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे या समुहाने कर्ज कमी करुन बांधकाम व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.

Advertisement

अमेरिकन इक्विटी फर्म अॅडव्हेंट इंटरनॅशनल ही कंपनी युरेका फोर्ब्स विकत घेणार असल्याचे समजते. त्यासाठीचा व्यवहार सुमारे 5000 कोटी रुपयांचा असणार आहे. युरेका फोर्ब्स कंपनी वॉटर प्युरिफायर्स, तसेच व्हॅक्युम क्लीनर बनविते. ‘एसपी’ ग्रुपने या करारासाठी स्टँडर्ड चार्टर्ड ग्रुपची निवड केलीय. एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फोर्ब्स आणि कंपनीच्या विलीनीकरणानंतर युरेका फोर्ब्स कंपनी स्थापन केली जाईल. विलीनीकरण मंजूर झाल्यावर ही कंपनी अॅडव्हेंट इंटरनॅशनलला विकली जाईल.

Advertisement

युरेका फोर्ब्स कंपनीची स्थापना 1982 मध्ये झाली होती. एसपी ग्रुपच्या 17 कंपन्यांपैकी ती एक आहे. अॅक्वागार्ड वाॅटर प्युरिफायर, युरोक्लिन व्हॅकूम क्लिनर सारखे ब्रँड या कंपनीचे आहेत. सध्या या कंपनीचे 35 देशांमध्ये 20 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीची एकूण उलाढाल 2857 कोटी रुपये होती.

Advertisement

अहवालानुसार, एकूण 20 हजार कोटींच्या कर्जापैकी 12 हजार कोटींचे कर्ज सध्या रिझर्व्ह बँकेच्या कोविड रिलीफ स्कीम अंतर्गत येते. याअंतर्गत, कंपनीला 2023 पर्यंत हे थकीत करायचे आहे. तथापि, कंपनीला पुढील काही महिन्यांत त्याचे निम्मे पैसे द्यावे असे वाटते. म्हणूनच युरेका फोर्ब्सची निर्गुंतवणूक केली जात आहे.

Advertisement

युरेका फोर्ब्स व्यतिरिक्त शापूरजी पल्लोनजी समूह अधिक निधी उभारण्यासाठी स्टर्लिंग अँड विल्सन सोलर, अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर काही रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत असल्याचे मानले जाते. इन्व्हेस्टमेंट फर्म वॉरबर्ग पिंकस (Warburg Pincus) आणि स्वीडिश घरगुती उपकरणे उत्पादक इलेक्ट्रोलक्स (Electrolux) देखील युरेका फोर्ब्स खरेदी करण्याच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मोदी सरकार लाॅंच करणार नवीन चॅनेल, संसदेचे कामकाज, माहितीपूर्ण कार्यक्रम त्यावर प्रसारित होणार..
नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बेराेजगार भत्ता, श्रम मंत्रालयाकडून योजनेला मुदतवाढ..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply