Take a fresh look at your lifestyle.

ऑक्सिजन पुरवठा, अॅम्ब्यूलन्सबाबत केंद्र सरकारने दिल्यात महत्वाच्या सूचना; ऑक्सिजन युनिटसाठी घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, देशभरात ऑक्सिजनचा पुरवठ्यात वेगाने वाढ करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. त्यांनी राज्यांना औषधांचा बफर स्टॉक ठेवण्यास सुद्धा सांगितले. तिसऱ्या लाटेत मुलांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता देशभरातील रुग्णालयांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यांना हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरची पुनर्रचना करण्यास सांगण्यात आले.

Advertisement

देशभरात ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि पीएसए प्रकल्पांची संख्या वेगाने वाढली पाहिजे. सध्या देशभरात 961 लिक्विड मेडिकल स्टोरेज टँक आणि 1450 मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टीम बसवण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचे किमान एक युनिट बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

पंतप्रधानांनी देशभरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कामाची माहिती घेतली. आतापर्यंत एक लाख ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि 3 लाख ऑक्सिजन टाक्या राज्यांना दिल्या आहेत. रुग्णवाहिकेचे जाळे विस्तारित केले जात आहे जेणेकरून प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान एक रुग्णवाहिका उपलब्ध असेल, असे नियोजन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement

कोविड इमर्जन्सी रिस्पॉन्स पॅकेज 2 अंतर्गत ग्रामीण भागात कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत माहिती घेण्यात आली. तसेच देशातील कोरोना लसीकरणात आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply