Take a fresh look at your lifestyle.

महागाईचे चटके..! आता सीएनजी-पीनजी इंधनाचेही दर वाढणार; पहा, कुणी व्यक्त केलाय ‘हा’ अंदाज

मुंबई : देशातील महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. पेट्रोल-डिजेलसह घरगुती गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा अशीच बातमी आली आहे. मुंबई आणि दिल्ली या मोठ्या शहरात ऑक्टोबर महिन्यात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 10 ते 12 टक्क्यांपर्यंत दरवाढ होण्याचा अंदाज ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्योरिटीजने व्यक्त केला आहे. सरकारद्वारे निर्धारीत गॅसच्या किमतीत साधारण 76 टक्के वाढ होणार आहे, त्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीवर होईल.

Advertisement

1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत अॅडमिनिस्टर्ड रेट 3.15 डॉलर प्रति युनिटपर्यंत वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे. याचा अर्थ असा की सीएनजी आणि पीएनजीचा खर्च वाढेल. त्यामुळे या गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. या कंपन्यांना साधारण 10 ते 11 टक्के किमतीत वाढ करावी लागेल, असा अंदाज आहे.

Advertisement

याआधी तेल कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे गॅस टाकीचे दर पुन्हा वाढले होते. गेल्या वर्षभराच्या काळात एलपीजी गॅसच्या किमतीत 265.50 रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट प्रमाणेच याआधी तेल कंपन्यांनी 1 जुलै रोजी गॅस टाकीच्या किमतीत वाढ केली होती. यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 25 रुपयांनी वाढल्या होत्या. त्यानंतर 1 ऑगस्टला फक्त कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली होती. यावेळी कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर 73.5 रुपयांनी वाढले होते.

Advertisement

इंधनाच्या दरात तर सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी इंधन आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply