Take a fresh look at your lifestyle.

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार बेराेजगार भत्ता, श्रम मंत्रालयाकडून योजनेला मुदतवाढ..!

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आता हाताला काम नसल्याने अशा अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, बेरोजगार तरुणांसाठी एक आनंददायक बातमी आहे.

Advertisement

श्रम मंत्रालयाअंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे अटल बीमा व्यापारी कल्याण योजना चालविली जाते. या योजनेचा लाभ अशा लोकांना दिला जातो, ज्यांनी नोकरी गमावली आहे. त्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) आर्थिक मदत वा भत्ता दिला जातो. तसेच अर्जदार व कुटुंबाला सहा महिन्यांसाठी ESIC कव्हर किंवा वैद्यकीय सुविधा मिळते. एखाद्याने नोकरी गमावल्यास, त्यास पुढील सहा महिन्यांसाठी ईएसआयसीद्वारे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांवर उपचार करू शकतो.

Advertisement

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती अजूनही रुळावर आलेली नाही. त्यात अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागल्याने बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाची नुकतीच १८५ वी  बैठक झाली. त्यात बेराजगारांच्या मदतीसाठी या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता या योजनेचा लाभ आता जून 2022 पर्यंत घेता येणार आहे. त्यानुसार या योजनेत अर्ज केल्यानंतर, भत्त्याचा लाभ घेता येईल.

Advertisement

अटल बीमा व्यापारी कल्याण योजनेअंतर्गत नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी दिली जाते. कोणत्याही बेरोजगारास नवीन नोकरी शोधण्यासाठी तीन महिने हा पुरेसा कालावधी आहे. मात्र, एखाद्यास लवकर नोकरी मिळाली आणि ईएसआयसीमध्ये त्याचे योगदान येऊ लागले, तर ही रक्कम तीन महिन्यांपूर्वी थांबवली जाते. तथापि, जर नोकरी पुन्हा गमावली गेली, तर त्याला पुन्हा या योजनेच्या उर्वरित भागाचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती ‘ईएसआयसी’चे विमा आयुक्त एम. के. शर्मा यांनी दिली.

Advertisement

ईएसआयसीच्या बैठकीत अटल बीमा व्यापारी कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यासह अन्य काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले. त्यात कर्नाटकात 100 खाटांची दोन ईएसआयसी रुग्णालये बांधली जातील. शिवाय केरळमध्ये सात नवीन दवाखानेही उघडण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे 30 बेडचे नवीन ईएसआयसी रुग्णालय बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

करदात्यांना दिलासा.. आयटीआर भरण्यासाठी मोदी सरकारकडून मुदतवाढ, कसा होणार फायदा..?
सोने-चांदी बाजारभाव; म्हणून दरवाढीला लागला ब्रेक; पहा, आज काय आहे परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply