Take a fresh look at your lifestyle.

आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ; दोन दिवसांनंतर भाव वाढले; पहा, काय आहे मार्केटमधील परिस्थिती

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण आज थांबली आहे. आज शनिवारी सोन्याचे दर थोडेसे वाढले आहेत. तसेच चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. सोन्याचे दर जवळपास 70 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता सोन्याने पुन्हा 47 हजारांचा टप्पा पार केला आहे. चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तब्बल 300 रुपयांनी चांदी दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने 47 हजार 070 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 64 हजार 200 रुपये प्रति किलो असे नवे दर आहेत.

Advertisement

देशातील विविध शहरात सोने आणि चांदीचे दर एकसारखे नाहीत. चार मोठ्या शहरांचा विचार केला तर राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. मुंबईतही 46 हजार 250 रुपये असाच दर आहे. चेन्नई शहरात 44 हजार 510 रुपये असा भाव आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव नवी दिल्लीत 50 हजार 450 रुपये असा आहे. तर मुंबई शहरात 47 हजार 070 रुपये असा आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply