Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. राजकारण फिरले..! तालिबान्यांना बसलाय जोरदार झटका; पहा, रशियाने नेमके केले तरी काय ?

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तालिबानने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तालिबानकडून लवकरच सरकार गठीत करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच तालिबानला एक जोरदार झटका बसला आहे. होय, कारण रशियाने अचानक आपल्या धोरणात बदल केला आहे. तालिबानच्या सरकार स्थापनेच्या समारंभात सहभागी होण्यास रशियाने नकार दिल्याची बातमी आरईए या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Advertisement

रशियाच्या या निर्णयामुळे तालिबान्यांना मोठाच झटका बसला आहे. रशियाने अचानक हा निर्णय का घेतला, याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. याआधी रशियाने तालिबान सरकारला मान्यता देण्याचा विचार केला होता.

Advertisement

राजदूत दर्जाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील, असे रशियाने आधी म्हटले होते. आता मात्र रशियाने नकार दिल्याची माहिती आहे. रशियाच्या या बदललेल्या धोरणावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान लवकरच सरकार गठीत करणार आहे. यासाठी चीन, पाकिस्तान, रशिया, तुर्की, इराण, कतर या देशांना आमंत्रित केले होते. त्यानंतर मात्र रशियाने उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तान मध्ये सध्या ज्या कारवाया सुरू केल्या आहेत, त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

तालिबानवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशांनी तालिबानला इशाराही दिला आहे. मात्र, चीन आणि पाकिस्तानचे पाठबळ असल्याने तालिबानने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत आता तालिबान्यांचे सरकार सत्तेत येणार आहे.

Advertisement

तालिबानचा धोका चीनसह अन्य जवळच्या देशांनाही राहणार आहे. त्यामुळे भविष्यात तालिबानकडून काय निर्णय घेतले जातात, याकडे देशांचे लक्ष राहणार आहे. तसेही सध्या अमेरिकेसह अन्य देश अफगाणिस्तान मधील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

Advertisement

चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांकडेही लक्ष आहे. अशा परिस्थितीत रशियाने घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. सध्या तरी रशियाने आपल्या धोरणात बदल केला असला तरी रशिया या धोरणावर कायम राहिल याची शाश्वती देता येत नाही. भविष्यातील परिस्थिती पाहून रशिया आपल्या धोरणात बदल करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply