Take a fresh look at your lifestyle.

वाव.. निवडणुकीचा होतोय ‘असा’ ही फायदा; ‘या’ राज्यातील रस्त्यांबाबत सुरू होणार ‘हे’ अभियान

लखनऊ : उत्तर प्रदेश राज्यात 20 सप्टेंबरपासून विशेष अभियान सुरू केले जाणार आहे. या अभियानात राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. विशेष म्हणजे, फक्त दोनच महिन्यात म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यंत हे अभियान पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. उत्तर प्रदेश देशातील मोठे राज्य आहे. या राज्याची लोकसंख्या सुद्धा अन्य राज्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. त्यामुळे राज्यात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात सरकारलाही मोठी कसरत करावी लागते.

Advertisement

राज्यात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विरोधक राज्य सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आताही राज्य सरकारने सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे अभियान सुरू करण्याचा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

या बरोबरच विकासाची कामे करण्यावरही भर देण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हटल्यावर असे निर्णय घेतले जाणार यात शंका नाही. याआधी सरकारने केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोरोना पाठोपाठ उत्तर प्रदेशात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आवश्यक आदेश राज्याच्या संबंधित सरकारी यंत्रणांना दिले आहेत. या राज्यातील काही शहरात तर घरोघर ताप आणि अन्य आजारांचे रुग्ण सापडत आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी सरकारने कोविडच्या धरतीवर इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

रुग्ण तपासणी, उपचार आणि रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे अशी महत्वाची कामे याद्वारे केली जाणार आहेत. राज्यात सध्या डेंग्यू, वायरल फीवर, एक्यूट इंसेफेलायटिस सिंड्रोमसह अन्य आजारांचा आढावा घेण्यात आला.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply