Take a fresh look at your lifestyle.

सावधान..! व्हॉट्सअॅपचा वापरकर्त्यांना गंभीर इशारा; वाचा काय आहे कारण..

सायबर सिक्युरिटी फर्म kaspersky ने एक पॉप्युलर मॉड शोधला आहे जो वापरकर्त्यांच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर पोहचवण्याचं काम करतो.  तर या मॉडचं नाव FMWhatsApp असून यात Triada Trojan malware वापरकर्त्यांच्या मोबाईलमधून डेचा चोरी करतो. 

दिल्ली : सध्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर संपर्कासाठी मोठ्या फायद्याचा ठरत आहे. मात्र या फायद्याच्या आडून अनेकवेळा फसवणूकीच्याही घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे मेसेजिंगसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना गंभीर इशारा दिला आहे.

Advertisement

सायबर सिक्युरिटी फर्म kaspersky ने एक पॉप्युलर मॉड शोधला आहे जो वापरकर्त्यांच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर पोहचवण्याचं काम करतो.  तर या मॉडचं नाव FMWhatsApp असून यात Triada Trojan malware वापरकर्त्यांच्या मोबाईलमधून डेचा चोरी करतो. मॉड्स हे एखाद्या अॅप्लिकेशनचं युजर क्रिएडेट व्हर्जन असतं. त्यामुळे हेे व्हर्जन कंपनी अप्रुव्ह करत नाही. पण त्यामध्ये काही अधिक फिचर मिळत असल्याने अनेक वापरकर्ते अधिकृत अॅप्लिकेशनच्या तुलनेत अशा अॅपकडे वळतात.

Advertisement

kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, मॉड वापरकर्त्यांच्या डिव्हाईसमध्ये व्हायरस असलेल्या जाहीराती चालवतात. त्यामुळे यात अशा काही अॅड चालवल्या जातात की, ज्यात वापरकर्त्याला बॅकग्राऊंडल्या जाहिरात चालू असल्याची कोणत्याही प्रकारची माहिती नसते. त्यामुळे बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या अॅप वापरकर्त्याच्या फोनमधील डेटा अॅक्सेस करण्यासह चोरीही करू शकतात, असा इशारा दिला आहे.

Advertisement

याबरोबरच FMWhatsApp वापरकर्त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस करण्यासाठी एसएमएस (SMS)  वाचण्याची परवानगी मागतं आणि वापरकर्ते फेक असलेल्या अॅपला परवानगी देतात. त्यामुळे हॅकर मालवेअरच्या मदतीने वापरकर्त्यांच्या टेक्स्ट मेसेज बॉक्समध्ये येणाऱ्या व्हेरिफिकेशन कोडचा वापर केला जातो. तर त्यानंतर प्रिमीयम सबस्क्रिप्शन घेतले जाते. यामुळे kaspersky ने वापरकर्त्यांना या धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे, कारण अनेक वापरकर्त्यांना फेक अॅप्लिकेशनच्या बाबतीत माहिती नसते तर वापरकर्ते फक्त अधिक फिचर्स मिळण्याच्या नादात अशा प्रकारचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करतात. मात्र त्याचे वापरकर्त्यांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वापरकर्त्यांनी कोणतंही अॅप अधिकृत असलेल्या प्ले स्टोअरवरूनच डाऊनलोक करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply