Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..! वनप्लस ठरतोय मृत्यूचा सापळा; वाचा नेमकं काय घडलंय..

स्फोटानंतर गौरव यांनी वनप्लस विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर गौरव यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून वनप्लसच्या स्फोटाबाबत माहिती दिली

दिल्ली : तंत्रज्ञानाचा फायदा जेवढा तितकाच त्याचा मोठा तोटाही होतो. फायद्यासोबत तोटा जोडलेलाच असतो. मात्र एखाद्या तंत्रज्ञानाचा तोटा मृत्यूचं कारण ठरणं म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट.

Advertisement

दिल्लीतील गौरव गुलाटी यांनी दहा दिवसापुर्वी वन प्लस नॉर्ड 2 5 G घेतला होता. त्यामुळे गौरव खुप खूश होता. तर दोन तीन दिवसांपुर्वी गौरवने नव्या फोनचा वापर करायला सुरूवात केली. मात्र गौरवच्या मोबाईलची बॅटरी 90 टक्के फुल असताना त्याने मोबाईल ठेवलेल्या खिशातून धुर यायला लागला आणि काही समजायच्या आतच गौरवसोबत घात  झाला. त्याच्या वनप्लस मोबाईलचा भीषण स्फोट झाला.

Advertisement

या स्फोटात गौरव गुलाटी यांचा थोडक्यात जीव वाचला. मात्र गौरव गंभीररित्या जखमी झाला आहे. गौरवच्या पोटाला, कानाला आणि डोळ्याला स्फोटामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तर फोनमधून आलेल्या धुरामुळे गौरवला श्वास घेण्यास त्रास होत आहे. सध्या गौरव गुलाटी वर उपचार सुरू आहेत.

Advertisement

स्फोटानंतर गौरव यांनी वनप्लस विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर गौरव यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून वनप्लसच्या स्फोटाबाबत माहिती दिली. तसेच स्फोटानंतर फोनची अवस्था कशी झाली आहे, याचे त्यांनी फोटो शेअर केले आहेत. तर वन प्लस फोन खिशात घेऊन फिरणे म्हणजे मी डेथ सर्टिफिकेट घेऊन फिरत होतो, असे गौरवने म्हटले आहे. तर त्यांचा थोडक्यात जीव वाचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

वनप्लसचा स्फोट झाल्यानंतर गौरव गुलाटी यांनी कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी कंपनीच्या वतीने एक व्यक्ती भेटायला पाठवली. मात्र त्यांनी इन्वेस्टीगेशनसाठी मोबाईल सोबत नेण्याची विनंती केली. मात्र फोन पोलिसांच्या ताब्यात असल्याने फोन देण्यास नकार देण्यात आला. मात्र गौरव गुलाटी यांनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. याबाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे.

Advertisement

वनप्लस नॉर्ड सीरीजमध्ये स्फोट झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्याच महिन्यात वनप्लस नॉर्ड 2 फुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत वनप्लस फुटण्याची घटना घडल्याने वनप्लसच्या वापरकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply