Take a fresh look at your lifestyle.

भारत-इंग्लड सामन्यावरून रवी शास्री ट्रोल…वाचा काय आहे कारण…

इंग्लड दौऱ्यात भारताची कामगिरी समाधानकारक असल्याची पहायला मिळाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एक पराभव वगळता दोन सामन्यात विजय मिळवला आहे. भारत इंग्लडविरोधातील मालिकेत 2-1 ने पुढे आहे.

दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांनी इंग्लड दौऱ्यात भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करत चांगले यश मिळवले.  या दौऱ्यात भारताचा कसोटी सामन्यात एकमेव पराभव झाला होता. तर दोन सामन्यांत विजय मिळवला होता. मात्र यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्री यांना ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

Advertisement

भारताचे फिजीओ थेरपिस्ट योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली. काल रात्री सर्व खेळाडूंच्या आरटी पीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्या. तरीही भारत आणि इंग्लड सामना रद्द होणार का? अशी अटकळ बांधली जात होती. मात्र अखेर भारत आणि इंग्लड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. कारण भारतीय संघातील अनेक सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांचाही सामावेश आहे.

Advertisement

इंग्लड दौऱ्यात भारताची कामगिरी समाधानकारक असल्याची पहायला मिळाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एक पराभव वगळता दोन सामन्यात विजय मिळवला आहे. भारत इंग्लडविरोधातील मालिकेत 2-1 ने पुढे आहे. तर भारताने लॉर्डस आणि ओव्हल कसोटी सामना जिंकला आहे. त्यामुळे मँचेस्टर येथील अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनला असता.  मात्र मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाल्याने इतिहास रचण्याची संधी हातून निसटली आहे.

Advertisement

त्यामुळे सामना रद्द झाल्यानंतर शास्त्री चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. कारण चौथा कसोटी सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी रवी शास्री आणि भारतीय संघाचे खेळाडू एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा संदर्भ या घटनेला दिला जात आहे.

Advertisement

भारताला इतिहास रचण्याची संधी असताना अचानक सामना रद्द झाल्याने चाहत्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांच्यावर भडास काढली आहे. त्यामुळे ट्वीटरवर रवी शास्रींना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply