Take a fresh look at your lifestyle.

चीननंतर आता पाकिस्ताननेही टाकलाय डाव; अफगाणिस्तानबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय; पहा, कोणाचा होणार फायदा ?

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबान चीन आणि पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकत चालला आहे. हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. तालिबानकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे चीनने 310 लाख अमेरिकन डॉलर मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच पाकिस्ताननेही असाच एक डाव टाकला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान बरोबर आपल्या चलनातच व्यापार करणार असल्याचे म्हटले आहे. तालिबानकडे यास मंजुरी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे तालिबान सुद्धा यास हरकत घेणार नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली आहे.

Advertisement

तालिबानने अफगाणिस्तान मध्ये सरकार गठीत केले आहे. आता देश चालवायचा कसा असा मोठा प्रश्न तालिबान्यांसमोर आहे. कारण, अमेरिका आणि अन्य जागतिक वित्तीय संस्थांनी अफगाणिस्तानच्या राखीव निधीवर निर्बंध आणले आहेत. तसेच तालिबानला कोणतीही आर्थिक मदत करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालिबानच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत चीनने संधी साधत तालिबानला मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे तालिबानला आता अन्य देशांच्या मदतीची गरज राहणार नाही. चीन तालिबानला पैसे देणार आहे.

Advertisement

या मदतीच्या मोबदल्यात चीन काय घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, चीनने आता जगाची पर्वा न करता या देशात हस्तक्षेप सुरू केला आहे. जगातील कोणत्याही देशाने यास अद्याप विरोध केलेला नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानही सक्रीय झाला आहे. चीन आणि पाकिस्तान दोघे मिळून तालिबानला मदत करत आहेत.

Advertisement

अफगाणिस्तान बरोबर पाकिस्तानी चलनानेच व्यापार करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. अफगाणिस्तानकडे सध्या डॉलर्सची कमतरता आहे. त्यामुळे पाकिस्तानी चलनाचा वापार व्यापारावेळी केला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

Advertisement

यामध्ये पाकिस्तानला स्वतःचा फायदा दिसत आहे. कारण, आजमितीस पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अफगाणिस्तान बरोबर व्यापार सुरू केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल, असे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना वाटत आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन अत्यंत कमजोर आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply