Take a fresh look at your lifestyle.

अखेर केंद्र सरकारने जारी केलाय ‘तो’ अहवाल; पहा, देशात काय दिलासादायक घडलेय

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीबाबत माहिती देणारा अहवाल अखेर केंद्र सरकारने जाहीर केला आहे. याआधी सरकारने बऱ्याच दिवसांपासून हा अहवाल नेहमीप्रमाणे जारी केला नव्हता. त्यामुळे बेरोजगारीची माहिती घेण्यासाठी सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी सारख्या खासगी संस्थांवर अवलंबून रहावे लागत होते. आता मात्र केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने याबाबत अहवाल दिला आहे. या अहवालानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षातील डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत शहरी बेरोजगारी दर कमी होऊन 10.3 टक्क्यांवर आला आहे. याआधी जुलै ते सप्टेंबर 2020 या तिमाहीत बेरोजगारी दर 13.2 टक्के होता.

Advertisement

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीत बेरोजगारी दर फक्त 7.8 टक्के होता. त्यानंतर मात्र देशभरात कोरोना महामारीचे संकट आले. या संकटात मात्र लाखो लोकांनी रोजगार गमावले. त्यामुळे बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सांख्यिकी कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे.

Advertisement

या सर्वेनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत बेरोजगारी दर सर्वाधिक म्हणजेच 20.8 टक्के होता. कारण, या काळात देशभरात कोरोना हा घातक आजार वेगाने फैलावत होता. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले होते. त्याचा परिणाम म्हणून अनेक कंपन्यांनी कोणताही विचार न करता कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशातील नावाजलेल्या कंपन्यांनीही अशा पद्धतीने निर्णय घेतले. त्यामुळे या काळात बेरोजगारी दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर परिस्थिती अधिकच खराब होती. या काळात राज्यांनी लॉकडाऊन केले होते. दुसरी लाट कमी झाल्यानंतर लॉकडाऊनच्या निर्बंधात सवलती दिल्या. त्यामुळे देशातील आर्थिक घडामोडी पुन्हा वेगाने सुरू झाल्या आहेत. अर्थव्यवस्था सुद्धा पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून काही प्रमाणात बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply