Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आज येणारा जियोचा स्मार्टफोन आता मिळणार दिवाळीत; कंपनीने अचानक बदलला निर्णय; पहा, नेमके काय म्हटलेय कंपनीने

मुंबई : देशातील नागरिक रिलायन्सच्या 5 जी स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना आणखी काही काळ थांबावे लागणार आहे. कारण, आज 10 सप्टेंबर रोजी रिलायन्सच्या स्मार्टफोनचे लाँचिंग कंपनीने अचानक रद्द केले आहे. आता हा कमी दरातील स्मार्टफोन दिवाळीत लाँच केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. रिलायन्सचा हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘जियो फोन नेक्स्ट’ ची अॅडव्हान्स ट्रायल सध्या सुरू आहे. त्यामुळे या फोनचा रोल आऊट आता दिवाळीच्या दरम्यान केला जाईल, असे जिओने म्हटले आहे.

Advertisement

जियो आणि गुगलद्वारे हा फोन विकसित केला जात आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी हा फोन लाँच होईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले होते. त्यामुळे देशभरातील नागरिक या नव्या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, असे घडले नाही. कारण आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी हा फोन कंपनीने लाँच केलेला नाही. आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. कंपनीने नियोजनात बदल करुन आता हा फोन दिवाळीच्या दरम्यान लाँच करणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

सध्या दोन्ही कंपन्यांनी जियो फोन नेक्स्टला आधिक सक्षम बनवण्यासाठी काही युजर्सना वापरण्यासाठी दिला आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर दिवाळीच्या सुरुवातील फोन लाँच केला जाईल. या मुदतीत सेमी कंडक्टरची कमतरता सुद्धा कमी होईल तसेच या काळात आधिक सेमी कंडक्टर साठवणूक करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, जियो फोन नेक्स्ट हा देशातील सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये इंटरनेटचा वेग जास्त असेल. त्यामुळे लोकांच्या दैनंदीन आयुष्यात आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, असा दावा करण्यात आला आहे. या फोनची किंमत किती असेल याबाबत कंपनीने आधिकृत काहीही सांगितलेले नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4 हजार रुपयांच्या आसपास असेल. असे असले तरी कंपनी किती किंमत निश्चित करणार आहे, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणारच आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply