Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर..! केंद्र सरकार त्या कर्मचाऱ्यांना देणार पैसे…वाचा कोणाचं नशीब उजळलं…

दोन महिन्यांपुर्वी केंद्र सरकारने 11 टक्के दराने डीआर आणि डीए जारी करण्याचा निर्णय जारी केला होता. तर ही रक्कम 1 जुलैपासून देण्यात आली आहे.

दिल्ली : वेगवेगळ्या वेतन आयोगासाठी विविध कर्मचारी संघटना राज्य किंवा केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत असतात. त्यात अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर सरकार कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत असते. परंतू यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचं नशीब उजळलं आहे.

Advertisement

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरला स्थगिती देण्यात आली होती. तर त्याच काळात केंद्रीय जवानांनी त्यांची कामगिरी उत्तरमरित्या पार पाडली होती. या काळात त्यांनी आपला एक दिवसाचा पगार पीएमकेअर फंडात जमा केला होता. तर नॅशनल कौन्सिल ऑफ पर्सोनेल चे सचिव आणि इतर सदस्यांनी डीए-डीआरच्या रकमेसाठी सरकारवर दबाव आणला होता. तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकावर निशाणा साधला होता.

Advertisement

दोन महिन्यांपुर्वी केंद्र सरकारने 11 टक्के दराने डीआर आणि डीए जारी करण्याचा निर्णय जारी केला होता. तर ही रक्कम 1 जुलैपासून देण्यात आली आहे. तर त्यासाठी 1 जानेवारी 2020 ते 1 जुलै 2021 या कालावधीत डीए आणि डीआरचा दर गोठवण्यात आला होता. मात्र या काळात डीएचे दर वाढवले नाहीत. तसेच 18 महिन्यांत केवळ 17 टक्के डीएचा दर होता, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांनी डीएची थकबाकी न भरताही सरकारने 18 महिन्यात डीएचा दर समान ठेवला. मात्र या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या किंवा मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ देण्याची मागणी जेसीएमने केली आहे.

Advertisement

1 जानेवारी 2020 ते 1 जुलै 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या डीएच्या वाढीव दराच्या आधाराने त्यांची ग्रॅच्यूईटी आणि वाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने तीन श्रेणी केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या गणनेसाठी डीएच्या मुळ वेतनाच्या 21 टक्के, 24 टक्के आणि 28 टक्के हा निकष लावण्यात आला आहे. 1 जानेवारी 2020 ते 30 जुन 2020 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना डीए 21 टक्के असेल. तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर दरम्यान सेवानिवृ्तत झालेल्या कर्मचाऱ्यांना डीए 24 टक्के असेल. तसेच तिसऱ्या श्रेणीतील जे कर्मचारी 1 जानेवारी 2021 ते 30 जुन 2021 दरम्यान सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना डीए 28 टक्के असेल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही सरकारकडून मोठी खुशखबर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply