Take a fresh look at your lifestyle.

करदात्यांना दिलासा.. आयटीआर भरण्यासाठी मोदी सरकारकडून मुदतवाढ, कसा होणार फायदा..?

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न भरता भरता राहिला असल्यास, तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण मोदी सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. करदात्यांना फाईन बसू नये, यासाठी मोदी सरकारने शेवटची संधी दिली आहे. सध्या ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत होती. मात्र, आता नागरिक 31 डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरु शकतात. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

याबाबत इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट केलेय. त्यात म्हटलेय की, “आयकर रिटर्न (ITR) आणि आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांनी नोंदविलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची तारीख आणि ऑडिट रिपोर्टच्या तारखा मूल्यांकन वर्ष 21-22 साठी वाढविण्यात आल्या आहेत.”

Advertisement

त्यानुसार टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2022 पर्यंत वाढविली आहे. त्यालाही तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलीय. आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत व्यवहारांबाबत अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Advertisement

या बदलांमुळे कोरोना, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो करदात्यांना फायदा होणार आहे.

Advertisement

कसे भराल इनकम टॅक्स रिटर्न..?

Advertisement

– इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयकर https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

Advertisement

– त्यानंतर ई-फाइल मेनूवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा.

Advertisement

– आयकर रिटर्न पृष्ठावर पॅन ऑटो पॉप्युलेट होईल, येथे मूल्यांकन वर्ष निवडा, आता आयटीआर फॉर्म क्रमांक निवडा, आता तुम्हाला फायलिंग प्रकार निवडावा ज्यामध्ये मूळ / सुधारित रिटर्न निवडावे.

Advertisement

– त्यानंतर आता सबमिशन मोड निवडा. ज्यात ऑनलाईन तयारी आणि सबमिट निवडावे लागेल.

Advertisement

– नंतर Continue वर क्लिक करा. हे केल्यानंतर पोर्टलवर दिलेली मार्गदर्शक तत्वे वाचा. ऑनलाईन आयटीआर फॉर्ममध्ये रिक्त असलेल्या सर्व फिल्डमध्ये आपले तपशील भरा.

Advertisement

– यानंतर, पुन्हा कर आणि पडताळणी टॅबवर जा आणि तुमच्यानुसार सत्यापन पर्याय निवडा. पूर्वावलोकन आणि सबमिट बटणावर क्लिक करा, ITR मध्ये प्रविष्ट केलेला डेटा सत्यापित करा. शेवटी ITR सबमिट करा.

Advertisement

इन्फोसिस टेक्नोलॉजी कंपनीने ITR फाइल करण्यासाठी 7 जून रोजी हे पोर्टल लाँच केले होते. मात्र, या साइटवर अडचणी येत असल्याने बऱ्याच लोकांचे IRT भरायचे राहिले आहेत.

Advertisement

Income Tax 2.0 नव्या पोर्टलमध्ये तुम्ही नवीन पेमेंट पद्धत वापरू शकणार आहात. नेट बँकिंग, UPI, क्रेडिट कार्ड, RTGS आणि NEFT द्वारे पेमेंट करता येणार आहे. नव्या साईटवर आयटीआर भरणं सोप आणि वेगानं होऊ शकेल असं सांगितलं जात आहे.

Advertisement

साताऱ्यात राडा; दोन्ही राजे समर्थक भिडले…वाचा काय आहे कारण..
गहू, हरभरा, मोहरीच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply