Take a fresh look at your lifestyle.

क्रेडिट कार्ड बंद करण्याआधी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; नुकसान टाळण्यासाठी आहे महत्वाचे

मुंबई : तुमच्याकडे अनेक बँक क्रेडिट कार्ड असल्यास, योग्य व्यवस्थापन करणे कठीण होऊ शकते. अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांचा गोंधळ होतो. त्यामुळे काहीजण एक किंवा दोन क्रेडीट कार्ड बंद करण्याचा मार्ग स्वीकारतात. जर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचा विचार करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी आधी जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून योग्य माहिती मिळेल आणि आर्थिक नुकसानही होणार नाही.

Advertisement

क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी, सर्व थकीत बिले भरणे अत्यंत महत्वाचे आहे कारण, यावर व्याज आकारले जात असते. म्हणून, क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी, त्याची सर्व थकीत बिले भरणे गरेजेचे ठरते.

Advertisement

क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित सर्व ऑटो पेमेंट पेमेंट थांबवा. कित्येकदा असे घडते की क्रेडिट कार्ड धारकाकडे नेटफ्लिक्स किंवा अशा इतर प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन असू शकते किंवा ते कार्डसह ईएमआय आणि इतर बिले देखील भरत असतील. एकदा आपण क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ही देयके आपोआप बंद होत नाहीत. यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

Advertisement

आर्थिक तज्ञांच्या मते, जर तुम्हाला मोठ्या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर क्रेडिट कार्ड बंद करू नका. क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. जर स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कर्जावरील जास्त दराने व्याज द्यावे लागेल.

Advertisement

क्रेडिट कार्ड ऑफर हे त्याचे रिवॉर्ड पॉइंट असतात. जे कॅशबॅक, डिस्काउंट, कूपन याद्वारे रिडीम केले जाऊ शकतात. बर्‍याच वेळेस लोक या रिवॉर्ड पॉइंट्सकडे लक्ष देत नाहीत. मात्र, क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी या रिवॉर्ड पॉइंट्सचा उपयोग केला पाहिजे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply