Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव; म्हणून दरवाढीला लागला ब्रेक; पहा, आज काय आहे परिस्थिती

नवी दिल्ली : सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत असताना आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस सोन्याचे दर वाढत होते. त्यानंतर बुधवारपासून मात्र पुन्हा भाव कमी होत आहेत. काल गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर आजही सोन्याचे दर कमी झाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचे दरात 0.14 टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 46 हजार 793 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत कमी झाले आहेत. या काळात जर सोने खरेदीचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरू शकते.

Advertisement

सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होत असून हे दर असेच कमी होत राहिले तर काहीच दिवसात सोने 43 हजारांच्या टप्प्यात येईल. याआधी सोन्याचे दर 50 हजारांचा टप्पा पार करतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. या आठवड्याचा विचार केला तर पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोने 47 हजार 451 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर होते.

Advertisement

आता मात्र दर कमी होऊन 46 हजार 793 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. या दिवसात सोने जवळपास 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीचे दरही 0.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 64 हजार 150 रुपये असा राहिला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत सोने मार्केटवर परिणाम होत आहे. जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर कमी होत आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Advertisement

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply