Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ कंपनीच्या कारचा मार्केटमध्ये दबदबा; पहा, कंपनीने काय केलीय कामगिरी

नवी दिल्ली : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. ऑगस्ट महिन्यात जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. वाहनांच्या एकूण विक्रीत 14.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 6.66 टक्के वाढ झाली आहे. तीनचाकी वाहने 79.70 टक्के, प्रवासी वाहने 38.71 टक्के आणि कमर्शियल वाहनांच्या विक्रीत 97.94 टक्के वाढ झाली आहे. ट्रॅक्टरच्या विक्रीत सुद्धा 5.50 टक्के वाढ नोंदवण्यात आली. मारुती सुझुकी कंपनीच्या प्रीमियम सेडान सियाझ कारने विक्रीचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत या कारच्या 3 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.

Advertisement

सियाझ सन 2014 मध्ये देशात लाँच करण्यात आली. मिड रेंज सेडान सेगमेंटमध्ये या कारची होंडा सिटी आणि ह्युंदाई कंपनीच्या कार बरोबर स्पर्धा आहे. या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये असल्याने मागणी वाढल्याचे सांगण्यात आले. तसेही देशात मारुती सुझुकीच्या चारचाकी वाहनांना मागणी असतेच. कंपनी सुद्धा याचा विचार करुन वाहनांच्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल करत असते. या व्यतिरिक्त अन्य कंपन्यांच्या वाहनांनाही देशभरात मागणी आहे.

Advertisement

ऑगस्ट महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर राहिली. कंपनीने 1 लाख 8 हजार 944 वाहनांची विक्री केली. त्यानंतर ह्युंदाई 43 हजार 988, टाटा मोटर्स 25 हजार 577, महिंद्रा 16 हजार 457 आणि kia motors ने 13 हजार 900 वाहनांची विक्री केली. दुचाकी वाहनांच्या विक्रीत Hero Motocorp कंपनीने पहिला क्रमांक मिळवला आहे. कंपनीने एकूण 3 लाख 13 हजार 74 वाहनांची विक्री केली. त्यानंतर होंडा मोटारसायकलने 2 लाख 48 हजार 108, बजाज 1 लाख 23 हजार 697 आणि सुझुकी कंपनीने 44 हजार 969 दुचाकी वाहनांची विक्री केली.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply