Take a fresh look at your lifestyle.

…तर पाकिस्तान बनू शकतो तिसरा अण्वस्र सज्ज देश…भारत-अमेरीकेचं टेन्शन वाढलं…वाचा काय आहे शास्रज्ञांचा रिपोर्ट

सध्या भारताचे शत्रूराष्ट्र असलेला पाकिस्तान मुजोर तालिबान्यांसोबत मिळून भारताच्या विनाशाचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी पाकिस्तान अत्यंत धोकादायक मार्गाचा वापर करत आहे.

दिल्ली : दुसऱ्या महायुध्दाचा अंत अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणूबाँबच्या धमाक्याने झाला. परंतू त्यानंंतर सुरू झालेल्या शीतयुध्दाच्या काळात अणूबाँबच्या निर्मीतीला वेग आला.  प्रत्येक देश शस्रास्राच्या बाबतीत सामर्थ्यशाली बनण्यासाठी अणूकार्यक्रम राबवायला लागला. भारतानेही 1974 साली पोखरण अणूचाचणी केली आणि कोणी भारतावर चाल केली तर आम्हीही जशाच तसे उत्तर देऊ हे जगाला ठणकावून सांगितले.

Advertisement

सध्या बुलेटिन ऑफ ऑटोमिक सायन्सच्या शास्रज्ञांंनी एक ताजा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यात अणूशास्रज्ञांच्या चमूने उपग्रहांच्या मदतीने केलेल्या तपासणीत जनरल कमर बाजवा यांची सेना नवीन लाँटर आणि सुविधा बनवत आहे. ज्या सुविधा अणूशक्तीशी जोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे अमेरीकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या संचालकांने एप्रिलमध्ये अमेरीकन काँग्रेससमोर दिलेल्या निवेदनात पाकिस्तान 2021 मध्ये आपला अण्वस्रांचा साठा वाढवू शकतो. तसेच याच वेगाने पाक आपला अण्वस्रांचा कार्यक्रम पुढे नेत राहिला तर त्यांची अण्वस्र डागण्याची क्षमता वाढेल, अशी चिंता व्यक्त केली होती.

Advertisement

सध्या भारताचे शत्रूराष्ट्र असलेला पाकिस्तान मुजोर तालिबान्यांसोबत मिळून भारताच्या विनाशाचे स्वप्न पाहत आहे. त्यासाठी पाकिस्तान अत्यंत धोकादायक मार्गाचा वापर करत आहे. त्यासाठी पाकिस्तानने अणूबाँब आणि क्षेपणास्रांची निर्मीती करायला सुरूवात केली आहे. तर बुलेटिन ऑफ अॅटोमिक सायन्स च्या शास्रज्ञांनी दिलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, जर पाकिस्तानने याच वेगाने अणूबाँब बनवणे सुरू ठेवले तर 2025 पर्यंत त्यांच्याकडे 200 अणूबाँब असतील.  तर भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या पाकिस्तानकडे सध्या 165 अण्वस्रे आहेत. तर सध्या पाकिस्तान अणूबाँबच्या निर्मीतीबरोबरच त्यांना टाकण्यासाठी सातत्याने आपली क्षेपणास्र आणि हवाई ताकद वाढवत आहे.

Advertisement

Advertisement

शास्रज्ञांनी पुढे म्हटले आहे की,  पाकिस्तानकडे चार प्लूटोनियम उत्पादन अणुभट्ट्य़ा आहेत. तसेच पाक आपलं युरेनियमचा साठा वाढवत आहेत त्यामुळे पाकिस्तान पुढील 10 वर्षात आपल्या अण्वस्रांची संख्या लक्षणीयरित्या वाढवू शकतो. त्यामुळे पाकिस्तान एका दशकात जगातील सर्वात मोठा अण्वस्रसज्ज देश बनू शकतो, अशी चिंता शास्रज्ञांनी व्यक्त केली.

Advertisement

पाकिस्तान भारताच्या विनाशासाठी आपला अण्वस्र कार्यक्रम अत्यंत गुप्तपणे चालवत आहे. तसेच पाकिस्तानकडे किती अणुबाँब आहेत हे त्यांनी कधीही जाहीरपणे सांगितले नाही. मात्र पाकिस्तान आपल्या शत्रूराष्ट्र असलेल्या भारतावर अण्वस्रांचा हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्रे, धोरणात्मक मोहिमांसाठी लढाऊ विमाने आणि कमी पल्ल्यांच्या अण्वस्र हल्ल्यांसाठी सक्षम शस्रे बनवत असल्याचे शास्रज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement
शास्रज्ञानी तपासणी केलेला पाकिस्तानचा अण्वस्र निर्मीतीचा प्रकल्प

भारताने पाकिस्तानविरोधात ‘कोल्ड स्टार्ट’ धोरण तयार केले आहे. या धोरणाला प्रत्यूत्तर देण्यासाठी पाक अण्वस्र धोरण राबवत आहे. कारण पाकने व्यापलेली आपली जमीन घेण्यासाठी भारताने हल्ला केल्यास पाक अण्वस्र हल्ला करण्यासाठी मिराज लढाऊ विमान, अब्दाली, गझनवी, शाहीन, गौरी, नासर, अबाबिल बँलिस्टिक क्षेपणास्रांचा वापर करू शकतो. याशिवाय पाक बाबर क्रुझ क्षेपणास्र वापरू शकतो.

Advertisement

भारताची राजधानी दिल्लीसारख्या शहरावर अणुबाँब टाकला तर त्याचा परीणाम पाकिस्तानवर होऊ नये, यासाठी पाकिस्तान कमी क्षमतेचे अणुबाँबही बनवत आहे. मात्र पाकिस्तानचे झपाट्याने वाढणारी अण्वस्रसज्जता भारत व अमेरीकेसाठी तणावाचे कारण बनत आहे. त्यामुळे भारताशी वाद वाढल्यास अण्वस्रांनी युध्द होण्याचा धोका वाढल्याची भीती शास्रज्ञांनी व्यक्त केली.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply