Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तालिबान्यांना चीन देणार इतके पैसे; अमेरिकेच्या ‘त्या’ निर्णयानंतर चीनचा ‘हा’ नवा प्लान तयार

नवी दिल्ली : अफगाणिस्तामध्ये तालिबानी राजवटीत सध्या पैशांचा दुष्काळ आहे. अमेरिकेसह अन्य जागतिक संस्थांनी अफगाणिस्तानला आर्थिक मदत बंद केली आहे. त्यामुळे तालिबान सध्या कंगाल आहे. मात्र, या परिस्थितीचा फायदा घेत चीन मदतीसाठी आला आहे. तालिबान सरकारला तब्बल 310 लाख अमेरिकन डॉलर मदत देण्याची घोषणाही चीनने केली आहे. या काळात चीन तालिबानची मदत करत असला तरी त्यामागे चीनचे अनेक स्वार्थ आहेत.

Advertisement

अमेरिकेने अफगाणिस्तान मधून माघार घेतल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने या देशात वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तालिबान्यांचे जे सरकार आहे, ते पाकिस्तानच्या मदतीनेच गठीत करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे चीनने सुद्धा तालिबानला आपल्या कर्जाच्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. तालिबानकडे सध्या पैसे नाहीत. अमेरिकेसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्था मदत करण्यास तयार नाहीत. अशा वेळी चीनने डाव साधत मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या टप्प्यातील मदत निधी जाहीर केला आहे. हे पैसे आता लवकरच तालिबान्यांना मिळतील. तालिबानने अफगाणिस्तान मधील परिस्थिती पूर्वपदावर आणावी, असेही चीनने म्हटले आहे. तालिबानच्या सरकारचेही चीनने स्वागत केले आहे. या पद्धतीने चीनने या देशात हस्तक्षेप सुरू केला आहे. तालिबानने सुद्धा चीनच्या सीपीइसी प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केला आहे.

Advertisement

अशा पद्धतीने आता राजकीय घडामोडी घडत आहेत. असे काही होईल याचा अंदाज अमेरिकेसह अन्य देशांना आधीच होता. सध्या तसेच घडत आहे. मात्र, कोणत्याही देशाने अद्याप स्पष्ट धोरण घेतलेले नाही. अमेरिकेने सुद्धा अन्य देश काय विचार करतात तसेच चीन, पाकिस्तान, रशिया, इराण तालिबानबाबत भविष्यात काय धोरण स्वीकारतील, याचा अंदाज घेत आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेने या मुद्द्यावर मौन बाळगले आहे.

Advertisement

अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांसारख्या जागतिक संस्थांनी अफगाणिस्तानच्या रखीव निधीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे तालिबानला या पैशांचा वापर करता येणार नाही. आणि आताच्या घडीला देश चालवण्यासाठी तालिबानला पैशांची अत्यंत गरज आहे. अशा परिस्थितीत चीन तालिबानची मदत करू शकतो. चीनने पैसे देण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने सुद्धा अफगाणिस्तान मध्ये थेट हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. या घटना अमेरिका, भारत आणि अन्य युरोपीय देशांसाठी निश्चितच त्रासदायक ठरणार आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत याचा अधिक त्रास भारतास होण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply