Take a fresh look at your lifestyle.

अर्र… म्हणून ‘त्या’ लाखो स्मार्टफोन्सना बसणार झटका; पहा, गुगलने घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यात रोजच नवीन तंत्रज्ञान येत असते. त्यामुळे आज अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान काही दिवसातच कालबाह्य ठरण्याची शक्यता असते. स्मार्टफोन्सच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेला एखादा स्मार्टफोन आला की त्या तुलनेत जुने स्मार्टफोन मागे पडतात. या फोनचे तंत्रज्ञान जुने असल्याने कालांतराने हे फोन कालबाह्य ठरतात.

Advertisement

आताही गुगलने असाच एक निर्णय घेतला असून त्याचा फटका लाखो स्मार्टफोन्सना बसणार आहे. जगभरातील अनेक अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर गुगलचे प्रसिद्द अॅप्स बंद होणार आहेत. कंपनी या महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधून गुगल मॅप, युट्यूब आणि जी मेल सारख्या अॅप्सचे सपोर्ट बंद करणार आहे. कंपनीने याबाबत आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे.

Advertisement

अँड्रॉईड 2.3 वर्जन वापरणारे युजर्स साधारण 27 सप्टेंबरपासून आपल्या फोनवर गुगल अकौंट लॉग इन करू शकणार नाहीत. गुगलचे अँड्रॉईड 2.3 हे ऑपरेटिंग सिस्टीम सन 2010 मध्ये लाँच केले होते. आता मात्र हे वर्जन खूप जुने झाले आहे. त्यामुळे कंपनीने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा निर्णय घेणे महत्वाचे होते. सध्या अँड्रॉईड 11 सर्वात लेटेस्ट वर्जन असून पुढील काळात अँड्रॉईड 12 वर्जन येणार असल्याचे सांगितले जात आहे. युट्यूब, गुगल प्ले स्टोअर, गुगल मॅप्स, जीमेल हे काही अॅप्स जुन्या वर्जनमध्ये काम करू शकणार नाहीत.

Advertisement

गुगलचे हे अॅप्स सुरू ठेवण्यासाठी स्मार्टफोन अँड्रॉईड 3.0 मध्ये अपग्रेड करावा लागेल. त्यासाठी डिव्हाइस सेटिंग सिस्टीममध्ये Advance वर टॅप करुन system update करावे लागेल. अँड्रॉईड 2.3 चे सर्वच डिव्हाइस पुढील वर्जनमध्ये शिफ्ट होऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत नव्या डिव्हाइसवर अपेडशन करणे आवश्यक ठरेल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply