Take a fresh look at your lifestyle.

आता पोस्टाकडूनही मिळणार होमलोन, व्याजदर किती असणार जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : प्रत्येकाचे एक स्वप्न असते, ते म्हणजे हक्काचं घर. त्यामुळे अनेक जण पोटाला चिमटा काढून काडी काडी जमवितात, तरीही घराचे स्वप्न साकार करण्यासाठी बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येतेच. मात्र, आता तुमच्या मदतीला पोस्ट खाते येणार आहे. कारण, पोस्ट खात्यामार्फतही आता होमलोनची सोय करण्यात आलीय. त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

Advertisement

इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स बँक लिमिटेड यांच्यात नुकताच गृहकर्ज व्यवसाय वाढविण्यासाठी एक करार झाला. त्यानुसार सुमारे 4.5 कोटी ग्राहकांना आयपीपीबीच्या (IPPB) 1.36 लाख ऍक्सेस बँकिंग पॉइंटवर गृहकर्जाची सुविधा मिळणार आहे.

Advertisement

या करारामुळे पोस्ट ऑफिस बँकेचे 4.5 कोटी ग्राहक आता एलआयसी हाऊसिंग फायनान्सला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कंपनीला नवी बाजारपेठ आणि गृहकर्जांसाठी नवीन ग्राहक मिळतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरात 650 शाखा आणि 1.36 लाख बँकिंग टच पॉईंट्स आहेत.

Advertisement

इंडिया पोस्टच्या नेटवर्क अंतर्गत 2 लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्राम डाक सेवक आहेत. या लोकांकडे आता मायक्रो एटीएम, बायोमेट्रिक उपकरणांसारख्या सुविधा आहेत. इंडिया पोस्टने बँकिंग सेवेवरही खूप भर दिला आहे. LICHFL सोबत करार केल्याने इंडिया पोस्टचे कर्मचारी त्याच्यासाठी व्यवसाय आणण्याचे काम करतील.

Advertisement

एलआयसी हाऊसिंग फायनान्ससोबत करण्यात आलेले टायअप इंडिया पोस्टसाठी एक मोठे यश असल्याचे आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. वेंकटरमू यांनी सांगितले.

Advertisement

ते म्हणाले, की आमच्या ग्राहकांना गृहकर्जाची सुविधाही मिळेल. आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय आमचे लक्ष डिजिटल बँकिंगवर असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय विश्वनाथ गौर यांनी सांगितले की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेबरोबर भागीदारीमुळे आम्ही स्वतःसाठी नवी बाजारपेठ शोधू. त्यामुळे आमचा विस्तार वाढेल आणि नवीन ग्राहक आमच्यासोबत येतील. इंडिया पोस्ट देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात उपलब्ध आहे. त्यामुळेच पोस्ट ऑफिस नेटवर्कशी करार करणे हे आमच्यासाठी एक मोठे यश असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

कोणत्या दराने मिळणार गृहकर्ज..?

Advertisement

एलआयसी हाऊसिंग फायनान्स सध्या 6.66 टक्के दराने गृह कर्ज देत आहे. मात्र, हा व्याजदर 50 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी आहे. जर कोणी पगारदार असेल आणि त्याचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असेल तर या व्याजदराने 50 लाखांपर्यंतची गृहकर्ज सहज उपलब्ध होतात.

Advertisement

गहू, हरभरा, मोहरीच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा..!
शेअर्स बाजारातील या कंपन्यांवर लक्ष ठेवा, रग्गड पैसा कमवाल.. कसा तो वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply