Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितलेय ‘असे’ काही; ‘त्या’ 35 जिल्ह्यांमुळे टेन्शन वाढले..!

नवी दिल्ली : देशात अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावेळी केरळमुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. कारण, या राज्यात सध्या रुग्ण वेगाने वाढत आहेत. या व्यतिरिक्त देशातील 35 जिल्ह्यांमध्ये आजही दैनंदीन पातळीवर शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. देश अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन विभागाने केले आहे.

Advertisement

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. केरळमध्ये वेगाने रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्यात देशभरात जितके रुग्ण सापडले त्यामध्ये तब्बल 68.59 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये सापडले आहेत. तसेच अन्य राज्यातही काही ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे आपण अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट कमी होत चालला आहे. मात्र, 35 जिल्हे अजूनही असे आहेत की जेथे 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड 19 च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही.

Advertisement

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 135 देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply