Take a fresh look at your lifestyle.

..अन्यथा पुन्हा आंदोलन…अण्णांचा इशारा; वाचा काय आहे कारण…

1 जानेवारी 2014 रोजी अण्णांच्या आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने लोकपाल कायदा मंजुर केला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने लोकपालची नियुक्ती करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलन केल्याने मार्च 2019 मध्ये केंद्रात लोकपालची नियुक्ती केली.

अहमदनगर : 2002 मध्ये आंदोलनाच्या माध्यमातून देशाला माहिती अधिकार कायदा देणारे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात 2011 साली देशभर रान पेटवणाऱ्या अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनास्र उगारण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

जनतेचा पैसा लुटून गब्बर झालेल्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना चाप बसावा यासाठी अण्णा हजारे यांनी 2011 साली देशात मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर 1 जानेवारी 2014 रोजी अण्णांच्या आंदोलन आणि पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने लोकपाल कायदा मंजुर केला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने लोकपालची नियुक्ती करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलन केल्याने मार्च 2019 मध्ये केंद्रात लोकपालची नियुक्ती केली. त्यानंतरही या कायद्यात अनेक कमतरता आहेत. मात्र लोकपाल कायदा हा जनतेने आंदोलनातून निर्माण केलेला इतिहास आहे.

Advertisement

लोकपाल नियुक्त होऊन दोन वर्षे झाले. मात्र त्याबाबत अजूनही लोकांमध्ये जागृती नाही. हे केंद्र सरकारचे काम आहे. पण सरकारकडे इच्छाशक्तीचा आभाव आहे. कारण लोकपालाकडे भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. याचा अर्थ असा नाही की, केंद्रात भ्रष्टाचार होत नाही, अशा शब्दात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर टिका केली.

Advertisement

पुढे अण्णा हजारे म्हणाले की, केंद्रीय लोकपाल लोकायुक्त कायद्यातील तरतुदींनुसार लोकपाल कायदा लागू झाल्याच्या वर्षभराच्या आत सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांच्या धर्तीवर लोकपाल कायदा करावा, अशी तरतुद आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अण्णा हजारे यांनी 7 दिवसांचे उपोषण केले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा दिला होता. मात्र त्यानंतर समिती स्थापन केली परंतू त्याच्या अनेक बैठका होऊनही सरकार टाळाटाळ करत आहे? असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.

Advertisement

सध्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू  असून अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचारांची प्रकरणे उघड होत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण होत चालले आहे. तर केंद्र किंवा राज्य सरकारकडून भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. तसेच सध्याचा लोकायुक्त हा मुख्यमंत्र्यांकडून नेमला जातो. त्यामुळे लोकायुक्त कायद्याने स्वायत्त नसल्याने सक्षमपणे काम करू शकत नाही. अशा स्थितीत जनतेने न्याय कोणाकडे मागायचा?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला. त्यामुळे राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्यासाठी वयाच्या 85 व्या वर्षी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येते की काय? असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. तर राज्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हा आणि तालुकास्तरावर आंदोलनासाठी तयार रहावे, असे आवाहन केले आहे.

Advertisement

अण्णा हजारे यांनी म्हटले की, राज्यात सक्षम लोकपाल कायदा झाला नाही. तर वेळ पडल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल. कारण त्याशिवाय राज्यात सक्षम लोकपाल कायदा होणार नाही, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply