Take a fresh look at your lifestyle.

राणे अडकले; लुकआऊट नोटीस जारी…वाचा काय आहे कारण…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट सर्क्युलर जारी केले आहे.

मुंबई : राज्यात राणे कुटूंबिय आणि शिवसेनेत चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राणे आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर शिवसेनेकडून मुख्य़मंत्रीपद भुषवलेले आणि सध्या भाजपाकडून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांंच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याने त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यातच आता राणे कुटूंबियांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट सर्क्युलर जारी केले आहे. कारण नीलम राणे आर्टलाईन प्रॉपर्टिज या कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे 40 कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने डीएचएफएल कंपनीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांनंतर पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने  3 सप्टेंबर रोजी  लुकआऊट सर्क्यूलर जारी केले आहे. तर या प्रकरणात नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. (pune crime branch issues lookout circular against nitesh rane and wife of union minister narayan rane neelam rane)

Advertisement

दिवाणी स्वरूपाचे प्रकरण असूनही केवळ राजकीय सुडबुध्दीने ही कारवाई केली असल्याचे भाजपाच्या वतीने म्हटले आहे. तर याप्रकरणी नितेश राणे उत्तर देतीलच. पण अशा प्रकारे लुकआऊट नोटीस दिली असेल  तर ती कारवाई सुडबुध्दीने असल्याचे स्पष्ट आहे. तर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, कंगणा आणि अर्णब यांच्याविरोधात ज्याप्रकारे कारवाई केली. त्याच प्रकारे कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईने नीलम राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply