Take a fresh look at your lifestyle.

शेअर्स बाजारातील ‘या’ कंपन्यांवर लक्ष ठेवा, रग्गड पैसा कमवाल.. कसा तो वाचा..

मुंबई : शेअर बाजार म्हणजे, झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिले जाते. अर्थात त्यात जोखीम जास्त असली, तरी व्यवस्थित धोरण आखून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्ही रग्गड पैसा कमावू शकता. गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी सार्वकालिक उच्चांक पार केले आहेत. त्यामुळे सध्या अनेक जण या भांडवली बाजाराकडे वळल्याचे दिसते.

Advertisement

शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुलनेत कमी जोखीम असते. त्यामुळे ब्लू चीप वा मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. दरम्यान, काल (बुधवारी) शेअर बाजारात काहीसी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

इन्फोसिस, रिलायन्स आणि टीसीएस सारख्या बड्या कंपन्यांच्या समभागांची घसरण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीतही घसरण झाली. मात्र, अशा काळातही काही शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करु शकतात.

Advertisement

मारुती सुझुकीचे शेअर्स कोसळले

Advertisement

मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.39 टक्क्यांनी कोसळले. सेमी कंडक्टरमुळे ऑगस्टमध्ये कंपनीच्या उत्पादनात 8 टक्क्यांनी घट झाल्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. मारुतीच्या समभागाची किंमत घसरली. तसेच Auto PLI ही स्कीम केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी नसल्याची माहिती समोर आल्याने आज (गुरुवारी) शेअर बाजारात मारुती सुझुकीसह अन्य ऑटो कंपन्यांच्या समभागात मोठे चढउतार होण्याची शक्यता आहे.

Advertisement

टेक्स्टाईल कंपन्यांना तेजी

Advertisement

केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी 10,683 कोटी रुपयांच्या पॅकेजची काल (बुधवारी) घोषणा केली. त्यामुळे टेक्स्टाईल कंपन्यांचे समभाग आज (गुरुवारी) तेजीत असू शकतात.

Advertisement

युको बँकेच्या शेअर्समध्ये तेजीची शक्यता

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेच्या PCA (प्रॉम्प्ट करेक्टिव एक्शन) निकषांची पूर्तता करण्यात युको बँक यशस्वी ठरली. भांडवली नियमांचे पालन करण्याचे आश्वासन युको बँकेने दिलेय. त्यामुळे आज (गुरुवारी) युको बँकेच्या शेअर्सला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

एसबीआय लाईफ शेअर्सच्या विक्रीची घोषणा

Advertisement

कॅनडा पेन्शन फंडने एसबीआय लाईफचे 1159 कोटींचे शेअर्स विकण्याची घोषणा केलीय. त्यामुळे बुधवारी त्यांचे समभाग 1.68 टक्क्यांनी घसरला. आजदेखील त्यात घसरण पाहायला मिळू शकते.

Advertisement

एअरटेल आणि व्होडाफोन

Advertisement

मोदी सरकारने दूरसंचार कंपन्यांसाठी पॅकेज जाहीर केले. त्यामुळे एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपन्यांच्या समभाग बुधवारी वधारले होते. त्यातही तेजी दिसू शकते.

Advertisement

गहू, हरभरा, मोहरीच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा..!
आज सोने-चांदी मार्केटचा ट्रेंड बदलला; सोने आणि चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या, काय आहेत नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply