Take a fresh look at your lifestyle.

गहू, हरभरा, मोहरीच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा..!

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने 2022-23 च्या हंगामासाठी रब्बी हंगामातील पिकांचे किमान आधार मूल्य (MSP) अर्थात हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात गव्हाच्या हमीभावात 40 रुपये, हरभऱ्याच्या हमीभावात 130 रुपये, तर मोहरीच्या हमीभावात तब्बल 400 रुपयांची वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे हे नवीन दर जाहीर करण्यात आले. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Advertisement

शेतीबरोबरच मोदी सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रालाही उभारी देण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मंत्रीमंडळाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 10683 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेटिव्स (PLI) योजनेला मंजुरी दिली. हा प्रोत्साहन निधी 5 वर्षांच्या कालावधीत वस्त्रोद्योग क्षेत्राला दिला जाणार आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकरी मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. हे काये मागे घेण्याची मागणी अनेक शेतकरी संघटनांनी केली आहे. मात्र, मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. या कायद्यामुळे शेतमालाची एमएसपी कमी होणार नसल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ जाहीर केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Advertisement

रब्बी पिकांसाठी नवा हमीभाव (क्विंटलमध्ये)

Advertisement
  • गहू – 2015 रुपये (40 रुपये वाढ)
  • हरभरा – 3004 रुपये (130 रुपये वाढ)
  • जवस – 1635 रुपये (35 रुपये वाढ)
  • मसूर डाळ – 5500 रुपये (400 रुपये वाढ)
  • सूर्यफूल – 5441 रुपये (114 रुपये वाढ)
  • मोहरी – 5050 रुपये (400 रुपये वाढ)

वस्त्रोद्योग क्षेत्राला 10,683 कोटी

Advertisement

मोदी सरकारने देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीही 10,683 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्याद्वारे प्राॅडक्शन लिंक्ड इनसेटिव्स (PLI) योजना राबविण्यात येणार आहे. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात ही योजना मदत करील. या योजनेचा 7.5 लाख लोकांना थेट लाभ होणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल व माहिती व विकास मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

मोदी सरकार त्यासाठी देणार तब्बल 11 हजार कोटी रुपये; सात लाख रोजगार उपलब्ध होणार; पहा, सरकारने घेतलाय हा निर्णय
आज सोने-चांदी मार्केटचा ट्रेंड बदलला; सोने आणि चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या, काय आहेत नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply