Take a fresh look at your lifestyle.

प्रदूषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकार करणार ‘असा’ प्लान; पहा, काय नियोजन आहे सरकारचे

नवी दिल्ली : देशातील मोठ्या शहरात प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. राजधानी दिल्लीत तर प्रदूषण कमालीचे वाढले आहे. या प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे ही समस्या अतिशय विक्राळ होत आहे. असे असले तरी प्रदूषण कमी करणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे आता दिल्ली सरकार लवकरच एक विंटर अॅक्शन प्लान तयार करणार आहे. या योजनेत महत्वाच्या अशा 10 मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यामध्ये प्रदूषण हॉटस्पॉट, स्मॉग टॉवरचे कामकाज, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण आणि धुळीमुळे होणारे प्रदूषण यांचा समावेश आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत हा अॅक्शन प्लान तयार होईल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत अधिकार्‍यांचे एक पथक अन्य राज्यांबरोबर चर्चा करणार आहे, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

Advertisement

दिल्ली शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी आता येथे स्मोग टॉवर उभारण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा देशातील पहिलाच टॉवर आहे. अमेरिकेतील विशेष तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हा टॉवर सुमारे 24 मीटर उंच असून 1000 क्यूबिक मीटर प्रति सेकंद अशी या टॉवरची क्षमता आहे. हा टॉवर अतिशय वेगाने आसपासची हवा शुद्ध करू शकतो. जवळपास 1 किलोमीटरच्या रेंजमधील प्रदूषित हवा हा टॉवर शुद्ध करू शकतो. दिल्ली शहरातील कॅनॉट परिसरात हा टॉवर बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, जगात प्रदूषणाची समस्या किती वाढली आहे, कोणत्या शहरात किती प्रदूषण आहे याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे, की सन 2020 मध्ये बांग्लादेश जगात सर्वाधिक प्रदूषित देश होता. यानंतर पाकिस्तान, भारत आणि मंगोलिया हे देश होते. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत उत्तर प्रदेशातील गाजियाबाद शहराचा समावेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply