Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण करा, नाहीतर नोकरी नाही पगारही मिळणार नाही; पहा, कोणत्या विमान कंपन्यांनी घेतलाय ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला असताना नव्या व्हेरिएंटने जगातील अनेक देशांना पुन्हा त्याच संकटात ढकलले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल तर लसीकरणाला पर्याय नाहीच, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे काहीही करून लवकरात लवकर लसीकरण झाले पाहिजे, यासाठी सगळेच देश आटापिटा करत आहेत. काही देशांनी तर शंभर टक्के लसीकरण केले आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत, की ज्यांना अजून कोरोना लस सुद्धा माहीत नाही. तर, दुसरीकडे काही देशांनी लसीकरण सुरू केले आहे. पण, लसींची कमतरता असल्याने लसीकरणाचा वेग खूप कमी आहे.

Advertisement

लोकांच्या मनात शंका असल्यानेही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात, असेही प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी लोकांनी लसीकरण करावे, यासाठी त्यांना बक्षीसे देण्याच्या भन्नाट आयडिया वापरल्या जात आहेत. काही कंपन्यांनी मात्र लस घेतली नाही तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जगातील दोन मोठ्या विमान कंपन्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या वेस्ट जेट आणि अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सने त्यांच्या कोविड लसीकरण बंधनकारक केले आहे. तसेच लस घेतली नाही तर नोकरीवरुन कमी केले जाईल, असेही सांगितले आहे.

Advertisement

याबाबत आधिक माहिती अशी, कॅनडाच्या वेस्ट जेट या विमान कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे. किंवा 31 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण करावे असे सांगितले आहे. अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सनेही लसीकरणासाठी 27 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे बंधनकारक आहे. लसीकरण केले नाही तर नोकरीवरुन काढून टाकले जाईल आणि पगारसुद्धा मिळणार नाही, असे कंपनीने आदेशात म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, अमेरिकेत सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे डेल्टा व्हेरिएंट तर आहेच. या व्यतिरिक्त लसीकरणाचा कमी झालेला वेग आणि मास्क वापराबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याने रुग्ण वेगाने वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply