Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने चांदीचे भाव पडले; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती

मुंबई : काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात सोन्याचे भाव घसरले होते. त्यानंतर काल बुधवारी सोन्याचे दरात वाढ नोंदवण्यात आली. आज गुरुवारी मात्र सोन्याचे भावात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या वायदे दरात 130 रुपये म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरण झाली. सध्या 46 हजार 908 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत. चांदीच्या दरातही जवळपास 257 रुपये कमी झाले आहेत. सध्या एक किलो चांदी 63 हजार 926 रुपये दर आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Advertisement

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार गुरुवारी सोन्याचे दर कमी झाले आहेत. राजधानी दिल्लीत सध्या 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. मुंबईमध्ये 46 हजार 120 रुपये, कोलकाता मध्ये 46 हजार 650 रुपये आणि चेन्नई शहरात 44 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम असे सोन्याचे दर आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply