Take a fresh look at your lifestyle.

कोरोना महामारी अन् महागाईचा असाही इफेक्ट; खाद्यतेलांच्या बाबतीत पहिल्यांदाच ‘असे’ घडण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशात खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. किमती कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. कारण, आजही खाद्यतेलांच्या किमती सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्तच आहेत. कोरोना महामारी आणि वाढत जाणारी महागाई यामुळेही तेलांचे भाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत आता देशात खाद्यतेलाची आयात कमी होणार असल्याचे दिसत आहे. मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा खाद्यतेलांची आयात कमी राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

‘इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एसईए) चे वरिष्ठ कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांच्या मते, कोरोना महामारी संकट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी घट होऊ शकते. भारत जगभरात तेलांचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारताने कमी खरेदी केल्यामुळे मलेशियाचे पाम तेल आणि अमेरिकेचे सोया व सूर्यफूल तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. किमती कमी होऊ शकतात. कोरोना संकटाच्या आधी भारतातील तेलाचा वापर सातत्याने वाढत होता. पण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला संपलेल्या मार्केटिंग वर्षात, तेलांचा वापर 2.1 कोटी टन राहिला. मागील वर्षात हाच आकडा 2.25 कोटी टन इतका होता.

Advertisement

मेहता यांच्या मते, चालू मार्केटिंग वर्षात खाद्यतेलांच्या मागणीत सुधारणा होण्याची फार शक्यता नाही. याचे एक कारण म्हणजे देशात सध्या तेलांच्या किंमती खूप जास्त आहेत. 2020-21 मध्ये खाद्यतेलांची आयात 1.31 कोटी टन राहू शकते. एक वर्षापूर्वी 1.32 कोटी टन आकडा होता. तेलांच्या किमती जास्त असल्याने मागणी घटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारत देशांतर्गत वापरासाठी इंडोनेशिया आणि मलेशियामधून पाम तेल आयात करतो.

Advertisement

देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 10 टक्के केले होते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीआयसी) म्हटले होते, की इतर पाम तेलावरील आयात शुल्क 37.5 टक्के असेल. आयात शुल्काचे नवीन दर 30 जून ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू आहेत. यापूर्वी कच्च्या पाम तेलावर 15 टक्के आणि आरबीडी पाम तेल, आरबीडी पामोलिन, आरबीडी पाम स्ट्रेन आणि इतर पाम तेलावर 45 टक्के मूलभूत सीमाशुल्क होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply