Take a fresh look at your lifestyle.

वाव… आता ‘या’ कंपनीची इलेक्ट्रीक स्कूटर घेणार दणक्यात एन्ट्री; पहा, नेमके काय म्हटलेय कंपनीने

नवी दिल्ली : एकेकाळी भारतात स्कूटर म्हटले की ‘बजाज’ आणि ‘एलएमएल’ या दोनच कंपन्यांच्या स्कूटर असत. या दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरला देशभरात मोठी मागणी होती. कालांतराने तंत्रज्ञानात मोठे बदल झाले. नवी आणि तितकीच अत्याधुनिक वाहने आली. त्यामुळे या स्कूटर आता दिसेनाशा झाल्या आहेत. आज तर एखादीच अशी स्कूटर नजरेस पडते. आता तर इलेक्ट्रीक वाहनेही दाखल झाली आहे.

Advertisement

या वाहनांना मागणी वाढत असल्याने आघाडीच्या दुचाकी निर्मिती कंपन्या इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन करत आहेत. ‘एलएमएल’ कंपनीनेही पुन्हा दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. एका जबरदस्त प्रोडक्टसह कंपनी इलेक्ट्रीक दुचाकी मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कंपनी सध्या नव्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीवर काम करत आहे.

Advertisement

‘एलएमएल’ बाजारपेठेत प्रीमियम इलेक्ट्रीक स्कूटर आणू शकते. अन्य कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटरबरोबर एलएमएलच्या स्कूटरची स्पर्धा असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीस एका इन्वेस्टमेंट पार्टनरकडून मोठी गुंतवणूक मिळाली आहे. त्यामुळे कंपनी पुन्हा एकदा बाजारात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी एलएमएलची ‘एनव्ही’ स्कूटर देशभरातील मध्यमवर्गीय नागरिकांची ओळख होती. तसेच या कंपनीची ‘फ्रीडम’ मोटारसायकल तरुणांमध्ये प्रसिद्ध होती.

Advertisement

एलएमएल इलेक्ट्रीकचे व्यवस्थापकीय संचालक योगेश भाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी बाजारात असे एक प्रोडक्ट लाँच करेल जे अन्य कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरेल. कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटर प्रीमियम सेगमेंटमध्ये असतील.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply