Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अफगाणिस्तानबाबत अमेरिकेचे वेट अँड वॉच; पहा, चीन आणि तालिबानबाबत काय म्हणाले जो बायडेन

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने येथे सरकार गठीत करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. तालिबानने यासाठी चीन, पाकिस्तान, रशिया, तुर्की, कतर आणि इराण या देशांना आमंत्रण दिले आहे. अफगाणिस्तान मध्ये या घडामोडी सुरू असून जगातील अनेक देशांचे याकडे लक्ष आहे. विशेष करून अमेरिका या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तालिबान चीन आणि पाकिस्तानच्या जाळ्यात ओढला जात असल्याचे पाहून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
तालिबान आणि त्याच्या तीन मित्रांच्या वाटचालीबाबत उत्सुकता असून आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मधून माघार घेतल्यानंतर चीन तालिबान बरोबर चर्चा करणार याचा अंदाज होताच, आणि घडलेही तसेच. भविष्यात तालिबान चीनसाठी सुद्धा घातक ठरू शकतो, याची जाणीव चीनला सुद्धा आहे. त्यामुळे चीनने आतापासूनच तालिबान बरोबर जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात या देशांकडून तालिबानबाबत काय धोरण घेतले जाईल याची उत्सुकता आहे, असे बायडेन यांनी सांगितले.

Advertisement

अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांसारख्या जागतिक संस्थांनी अफगाणिस्तानच्या रखीव निधीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे तालिबानला या पैशांचा वापर करता येणार नाही. आणि आताच्या घडीला देश चालवण्यासाठी तालिबानला पैशांची अत्यंत गरज आहे. अशा परिस्थितीत चीन तालिबानची मदत करू शकतो. चीनने पैसे दिले तर तालिबानच्या अडचणी मिटणार आहेत.

Advertisement

चीनने तर आर्थिक मदत देण्याची घोषणाही केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने सुद्धा अफगाणिस्तान मध्ये थेट हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. या घटना अमेरिका, भारत आणि अन्य युरोपीय देशांसाठी निश्चितच त्रासदायक ठरणार आहेत.  अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत भारतास याचा आधिक त्रास होणार आहे. कारण, अफगाणिस्तान मध्ये तालिबानचे सरकार असले तरी त्यास संपूर्ण पाठबळ चीन आणि पाकिस्तानचे राहणार आहे.

Advertisement

मुळातच हे दोन्ही देश भारताचे शत्रू आहेत. त्यामुळे भविष्यात भारताविरोधात तालिबानचा वापर हे देश करणार नाहीत, याची काहीच खात्री देता येत नाही. अमेरिकेचे सध्याचे धोरण वेट अँड वॉचचे आहे. रशियानेही अद्याप या प्रकरणी मौन बाळगले आहे. त्यामुळे  आता भारत आणि अन्य युरोपिय देशांचे काय धोरण असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply